उस्मानाबाद जिल्ह्यात ३ ठिकाणी मारहाण , २ ठिकाणी अपघात गुन्हा दाखल

0


उस्मानाबाद जिल्ह्यात ३ ठिकाणी मारहाण , २ ठिकाणी अपघात गुन्हा दाखल


मारहान.

पोलीस ठाणे आनंदनगर : येडशी येथील डॉ. श्रीमती कांचन यांनी पती- डॉ. अरुण मोरे यांच्याविरुध्द  घटस्फोटाचा दावा दाखल केला असुन त्याच्या सुनावनीस कांचन या दि. 17 जुलै रोजी उस्मानाबाद न्यायालयात भाऊ- प्रथमेश व आपल्या दोन मुलींसह आल्या होत्या. यावेळी पती- अरुण यांनी पत्नी- कांचन हिला न्यायालयातून घटस्फोटाचा दावा मागे घेण्यास धमकावले असता  कांचन यांनी नकार दिला. सुनावनी नंतर भाऊ- प्रथमेश मोहिते याच्या कारमधून कांचन व त्यांच्या दोन्ही मुली येडशीकडे जाउ लागले असता पोदार शाळेसमोरील रस्त्यावर एका मोटारसायकलवरील दोघा अनोळखी पुरुषांनी प्रथमेश मोहिते यांची कार अडवून कारवर व प्रथमेश यांच्यावर दगडफेक केल्याने कारचे नुकसान होउन प्रथमेश हे जखमी झाले. अशा मजकुराच्या प्रथमेश मोहिते यांनी वैद्यकीय उपचारादरम्यान दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा.दं.सं. कलम- 307, 341, 506, 427, 109 अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.

पोलीस ठाणे तामलवाडी : पांगरधरवाडी, ता. तुळजापूर येथील सत्यवान गोपीनाथ शिंदे यांना शेत जमीनीच्या वादावरुन दि. 17 जुलै रोजी 15.00 वा. सु. सांगवीकाटी शिवारात भाऊबंद- किरण गहिनीनाथ शिंदे यांनी शिवीगाळ करुन विळ्याने मारहान करुन जखमी केले व ठार मारण्याची धमकी दिली. अशा मजकुराच्या सत्यवान शिंदे यांनी दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा.दं.सं. कलम- 324, 352, 504, 506 अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.

 

पोलीस ठाणे परंडा : भोत्रा, ता. परंडा येथील शेलार कुटूंबातील रोहिदास, गणेश, पिंटु, सुनिता, स्नेहा, स्वाती अशा सहा जणांनी बेकायदेशीर जमाव जमवून पुर्वीच्या भांडण- तक्रारीवरुन दि. 16 जुलै रोजी 17.30 वा. सु. राहत्या गल्लीत भाऊबंद- हनुमंत अनंता शेलार यांसह त्यांच्या कुटूंबीयांस शिवीगाळ करुन ठार मारण्याची धमकी दिली. तसेच लाथाबुक्क्यांनी, दगड, काठीने मारहान करुन जखमी केले. अशा मजकुराच्या हनुमंत शेलार यांनी दि. 17 जुन रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा.दं.सं. कलम- 143, 147, 148, 149, 324, 323, 504, 506 अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.

"अपघात.

पोलीस ठाणे कळंब : अच्युत श्रीपती कांदे, वय 49 वर्षे, रा. सापनाई, ता. कळंब हे दि. 15 जुलै रोजी 16.30 वा. सु. खेर्डा येथील येडशी- कळंब रस्त्यालगत थांबले होते. यावेळी विष्णु हरीभाउ माळी, रा. मस्सा  (खं.), ता. कळंब यांनी बस क्र. एम.एच. 14 बीटी 1629 ही निष्काळजीपने, भरधाव वेगात चालवून अच्युत कांदे यांना पाठीमागून धडक दिल्याने ते गंभीर जखमी होउन मयत झाले. अशा मजकुराच्या बाबासाहेब सोपान बाराते, रा. सापनाई यांनी दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा.दं.सं. कलम- 279, 304 (अ) सह मो.वा.का. कलम- 184 अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.

 

पोलीस ठाणे तामलवाडी : विठ्ठल ज्योतीबा मगर, रा. सांगवीकाटी, ता. तुळजापूर हे दि. 17 जुलै रोजी 07.45 वा. सु. सांगवीकाटी तलावाजवळच्या तुळजापूर- सोलापूर या राष्ट्रीय महामार्ग क्र. 52 च्या बाजूने पायी जात होते. यावेळी अज्ञात व्यक्तीने किया सेल्टॉस कार कम्र. एम.एच. 09 एफक्यु 8405 ही निष्काळजीने चालवून विठ्ठल मगर यांना पाठीमागून धडक दिल्याने ते गंभीर जखमी होउन मयत झाले. या अपघातानंतर नमूद कारचा अज्ञात चालक अपघात स्थळावरुन कारसह पसार झाला. अशा मजकुराच्या मयताचा भाऊ- संतोष मगर यांनी दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा.दं.सं. कलम- 279, 304 (अ) सह मो.वा.का. कलम- 134 (अ) (ब), 184 अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा (0)
To Top