सर्वांनी सोबतीने काम केले, तरच गाव समृद्ध : भास्कर पेरे पाटील : उमरगा सरपंच मार्गदर्शन बैठक संपन्न

0

सर्वांनी सोबतीने काम केले, तरच गाव समृद्ध :  भास्कर पेरे पाटील

उमरगा सरपंच मार्गदर्शन बैठक संपन्न

उमरगा  (महादेव पाटील)
उमरगा शहरात शांतिदुत परिवार व पंचायत समिती  आयोजित शुक्रवारी (दि.२०) रोजी सरपंच मार्गदर्शन बैठक मध्ये माजी सरपंच भास्करराव पेरे पाटील मार्गदर्शन करण्यात आले.




  कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी अध्यक्ष डॉ विठ्ठल जाधव, तर उपस्थिती मध्ये सौ विद्या जाधव, प्रमुख पाहुणे  डॉ दामोदर पंतगे,वन परिमंडळ अधिकारी तुकाराम डिगुळे,डॉ पंडित बुटूकणे,उमेश बिराजदर,अंजिलताई केंद्रे, आशितोष महाराज आदी उपस्थित होते.यावेळी बोलताना भास्कर पेरे पाटील म्हणाले की, आपल्या गावाचा विकास आपणच करु शकतो. त्यासाठी शासनावर अवलंबून राहण्याची आवश्यकता नाही. सरपंचांनी अत्यंत प्रामाणिकपणे, निस्वार्थपणे व पारदर्शक पद्धतीने गावाचा कारभार केल्यास गावातील लोक सरपंचावर विश्वास ठेवतात. या पद्धतीने मी माझ्या पाटोदा गावात कामे केली आहेत. म्हणून मला सांगण्याचा अधिकार आहे. सरपंचाने गावासाठी करावयाची पंचसूत्री त्यांनी सांगितली.






 पिण्याचे पाणी शुद्ध असले पाहिजे, पावसाच्या व सांडपाण्याचा प्रत्येक थेंब जमिनीत मुरला पाहिजे, गाव व परिसरात फळझाडांचे वृक्षारोपण केले पाहिजे, मुलांचे चांगले शिक्षण झाले पाहिजे, गावातील निराधारांना आधार दिला पाहिजे यासह गावकऱ्यांनीही १०० टक्के कर भरून ग्रामपंचायतीला सहकार्य करणे हे त्यांचे प्रथम कर्तव्य आहे. सरपंच कोणत्याही पक्षाचा असू द्या, तो सर्वांना सोबत घेऊन जाणारा असावा. आजच्या काळात पद, पैसा, बुद्धीला किंमत नाही, तर तुम्ही तुमच्या सोबत किती जणाला घेऊन काम करता, याला किंमत आहे.



 सर्वांना सोबत घेऊन काम केले, तरच गाव समृद्ध होईल,सरपंचाने गावकऱ्यांना सुविधा पुरवणे हे सरपंचाचे आद्यकर्तव्य आहे. असेही यावेळी पेरे पाटलांनी सांगितले.
  या शिबिरासाठी प्रा युसुफ मुल्ला,  अशोक बनसोडे, कदेर सरपंच सतीश साळुंखे, मुस्तफा इनामदार.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रवीण  स्वामी यांनी केले.

"पंचायत समितीचे कार्यक्रम असताना ही, कार्यक्रम पत्रिकेवर नाव असताना
पंचायत समिती गटविकास अधिकारी यांची अनुपस्थिती दिसून येत होती."




टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा (0)
To Top