भाजप कार्यालय उस्मानाबाद येथे टेक्निकल टेक्सटाईल पार्क संदर्भात महत्वपूर्ण बैठक झाली

0

भाजप कार्यालय उस्मानाबाद येथे टेक्निकल टेक्सटाईल पार्क संदर्भात महत्वपूर्ण बैठक झाली

उस्मानाबाद :- आज दि 2 रोजी  प्रतिष्ठान भवन भाजप कार्यालय उस्मानाबाद येथे टेक्निकल टेक्सटाईल पार्क संदर्भात महत्वपूर्ण बैठक झाली. बैठकीच्या सुरवातीला ,स्वर्गवासी गणपतराव देशमुखआणि स्वर्गवासी सिद्राम अलुरे गुरुजी याना भावपूर्ण श्रद्धांजली वाहन्यात आली.

भाजप जिल्हाध्यक्ष नितीन काळे यांनी कौडगाव midc येथील टेक्निकल टेक्सटाईल पार्क चा राज्यसरकारकडील प्रलंबित प्रस्ताव केंद्र सरकारकडे पाठविण्या बाबत महाराष्ट्र चे मुख्यमंत्री मा ना उद्धव ठाकरे यांना 10000 नागरिकांच्या सह्यांचे निवेदन देण्या संदर्भात मार्गदर्शन केले ,तसेच धाराशिव शहर ,वडगाव जि प गट उपळा जि प गट,येडशी जी,प गट  तसेच आंबेजवळगा जिप गट येथील सर्व पदाधिकारीकार्यकर्ते यांच्या 10000 हजार सह्यांचे निवेदन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना द्यायचे आहे ,त्या अनुषंगाने या भागातील शक्तिकेंद्र प्रमुख ,पदाधिकारी याना सह्या करण्यासाठी पोम्प्लेट देण्यात आले .

कौडगांव येथील औद्योगिक वसाहतीमध्ये नॅशनल टेक्नीकल टेक्स्टाईल मिशन अंतर्गत टेक्नीकल टेक्स्टाईल पार्क उभारण्याची तत्कालीन मुख्यमंत्री ना.देवेंद्रजी फडणवीस यांनी केलेली घोषणा प्रत्येक्षात उतरवुन त्यांच्या वाढ‍दिवसानिंमीत्त  अनोखी भेट देण्याचा संकल्प व्यक्त करत याबाबतचा दिड वर्षापासुन राज्य सरकारकडे प्रलंबित असलेला प्रस्ताव केंद्र सरकारकडे तातडीने पाठवावा यासाठी भारतीय जनता पार्टी कार्यकर्त्यांच्या मागणीचे निवेदन मुख्यमंत्री ना.उध्दवजी ठाकरे साहेब यांना पाठविण्यात आले आहे.

 उस्मानाबाद जिल्हयातील युवकांना रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्यासाठी आ.राणाजगजितसिंह पाटील साहेब यांच्या विनंती वरुन तत्कालीन मुख्यमंत्री तथा विद्यमान विधानसभेचे विरोधी पक्षनेते ना.देवेंद्रजी फडणवीस यांनी  उस्मानाबाद येथील कौडगाव औद्योगिक वसाहतीमध्ये टेक्निकल टेक्स्टाईल पार्क उभारण्याची घोषणा केली होती व या अनुषंगाने महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाच्या मुख्य कार्यकारी अधिकारी यांना अहवाल सादर करण्याबाबत सूचित केले होते. के.पी.एम.जी. संस्थेच्या माध्यमातुन तयार केलेला प्राथमिक प्रस्ताव एमआयडीसी च्या मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी राज्य शासनाकडे सादर केलेला आहे. परंतू महाविकास आघाडी सरकार सत्तेत आल्यापासुन दुर्दैवाने हा विषय प्रलंबित राहिला आहे. राज्याचे उद्योग मंत्री ना.सुभाषजी देसाई यांच्याकडे याबाबत बैठक घेण्याची मागणी आ.राणाजगजितसिंह पाटील यांनी अनेक वेळा केली परंतु त्यांची याबाबत अनास्था दिसून येते.

 इतर वस्त्रनिर्मिती उद्योगापेक्षा या तांत्रिक वस्त्र ( टेक्निकल टेक्सटाईल) उत्पादनाला जगभर अधिकचा वाव आहे. उस्मानाबाद सारख्या जिल्ह्यात या प्रकारचा उद्योग आल्यास येथील अर्थकारणाला मोठी चालना मिळू शकते. तांत्रिक वस्त्र निर्मितीला प्रोत्साहन देण्यासाठी केंद्र सरकारच्या वस्त्र मंत्राकडून एकीकृत वस्त्र निर्मिती पार्क (S.I.T.P.) योजनेच्या माध्यमातून पायाभूत सुविधा निर्माण करण्यासाठी अनुदान दिले जाते. महाराष्ट्र राज्य औद्योगिक विकास महामंडळाच्या माध्यमातून टेक्स्टाईल पार्क उभारण्यासाठी राज्य सरकारने केंद्र सरकारच्या वस्त्र मंत्रालयाकडे प्रस्ताव सादर करणे आवश्यक आहे. याबाबत उद्योग मंत्र्यांकडे मागणी करुन देखील मंत्रीमंडळाच्या मान्यतेसह प्रस्ताव केंद्र सरकारकडे पाठविला जात नाही.

उस्मानाबाद सारख्या आकांक्षीत जिल्हयात यासारखा रोजगार निर्मीती करणारा प्रकल्प उभारल्यास येथील १० हजार पेक्षा जास्त युवकांना रोजगार मिळु शकतो. कौडगांव येथे राज्यातील पहिल्या तांत्रीक वस्त्र निर्मीती प्रकल्पाची घोषणा करून ना.देवेंद्रजी फडणवीस यांनी उस्मानाबादकरांना मोठी भेट दिली होती. त्यामुळे त्यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांची ही संकल्पना पुर्णत्वास नेऊन त्यांना वाढदिवसाची अनोखी भेट देण्याचा मानस आ.राणाजगजितसिंह पाटील साहेब यांनी व्यक्त केला होता. त्या अनुषंगाने आज उस्मानाबाद येथे डॉ.श्यामाप्रसाद मुखर्जी बुथ अभियानांतर्गत आयोजित कार्यक्रमामध्ये मुख्यमंत्री यांना उस्मानाबाद येथे टेक्नीकल टेक्स्टाईल पार्क उभारण्याबाबत मंत्रीमंडळाच्या शिफारसी सह प्रस्ताव तातडीने केंद्र सरकारकडे पाठविण्याबाबतच्या आग्रही मागणीचे भारतीय जनता पार्टी कार्यकर्त्यांच्या स्वाक्षरीचे निवेदन पाठविण्यात आले आहे.

याप्रसंगी प्रका,,ऍड अनिल काळे ,जिल्हा सरचिटणीस प्रदीप शिंदे ,भाजयुमो जिल्हाध्यक्ष राजसिंह राजेनिंबाळकरजिल्हा उपाध्यक्ष इंद्रजीत देवकते,उपनगराध्यक्ष अभय इंगळे तसेच दाजीप्पा पवार,सुजित साळुंके ,नामदेव नायकल,ओम नाईकवाडीप्रवीण सिरसाठेनरेंद्र वाघमारेमेसा जानराव ,सुरज शेरकर गणेश मोरे ,डॉ प्रशांत पवार,तसेच शहरातील सर्व पदाधिकारी मोठ्या प्रमाणावर उपस्थित होते.


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा (0)
To Top