उस्मानाबाद जिल्ह्यात परंडा , तुळजापूर , उमरगा , या तीन ठिकाणी मारहान गुन्हे दाखल

0



उस्मानाबाद जिल्ह्यात परंडा , तुळजापूर , उमरगा ,  या तीन ठिकाणी मारहान गुन्हे दाखल 




परंडा पोलीस ठाणे : सारीका बनसोडे, रा. परंडा या दि. 18 ऑगस्ट रोजी 20.00 वा. सु. आपल्या घरात असतांना शेजारील- शितल रणदिवे, मंगल जमदाडे या दोघींनी पुर्वीच्या वादावरून सारीका यांच्या घरात घुसून त्यांना शिवीगाळ करुन लाथाबुक्क्यांनी, काठीने मारहान केली तसेच चावा घेउन जखमी केले. यावरुन भा.दं.सं. कलम- 452, 324, 323, 504, 506, 34 अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.






 

तुळजापूर पोलीस ठाणे : घरासमोर दगड टाकण्याच्या कारणावरुन बिजनवाडी, ता. तुळजापूर येथील सगट कुटूंबातील श्रीकांत, कमल, खंडु या तीघांनी दि. 19 ऑगस्ट रोजी 19.30 वा. सु. राहत्या गल्लीत शेजारील भाऊबंद- सदाशिव बाबुराव सगट यांच्यासह त्यांच्या पत्नीस शिवीगाळ करुन दगड, लोखंडी गजाने मारहान करुन जखमी केले. अशा मजकुराच्या सदाशिव सगट यांनी वैद्यकीय उपचारादरम्यान दिलेल्या लेखी निवेदनावरुन भा.दं.सं. कलम- 324, 323, 504, 34 अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.

 






उमरगा पोलीस ठाणे : गुगळगाव, ता. उमरगा येथील गणेश तळभोगे हे दि. 20 ऑगस्ट रोजी 14.00 वा. सु. मजुरांसह आपल्या शेतातील पिकाची खुरपनी करत होते. यावेळी शेत शेजारी- रावण कोकाटे, बळीराम कोकाटे, गणेश कोकाटे या तीघांनी बांधावर गवत टाकल्याच्या कारणावरुन तळभोगे यांना शिवीगाळ करुन ठार मारण्याची धमकी दिली व लाथाबुक्क्यांनी, लोखंडी नळीने मारहान करुन जखमी केले. अशा मजकुराच्या तळभोगे यांनी वैद्यकीय उपचारादरम्यान दिलेल्या लेखी निवेदनावरुन भा.दं.सं. कलम- 324, 323, 504, 506, 34 अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.

                                              

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा (0)
To Top