ख-या स्वातंत्र्यासाठी फसव्या सरकारांच्या विरोधात आण्णाभाऊंनी काढलेल्या महा जनांदोलनाची आजही गरजः राष्ट्रीय अध्यक्ष बीबीपी

0

ख-या स्वातंत्र्यासाठी फसव्या सरकारांच्या विरोधात आण्णाभाऊंनी काढलेल्या महा जनांदोलनाची आजही गरजः राष्ट्रीय अध्यक्ष बीबीपी

उस्मानाबाद :- बहुजन क्रांतिनायक अण्णाभाऊ साठे यांच्या, " यह आझादी झुठी है,  देश की जनता भुकी है."  या उद्घोषासह काढलेल्या महाजनमोर्चाला 75 वर्ष पुर्ण झाल्याच्या आठवणी प्रित्येर्थ बहुजन भारत पार्टी महाराष्ट्र प्रदेशने 16 ऑगष्ट 2021 ते 16 ऑगष्ट 2022 या संपुर्ण वर्षभरासाठी "बहुजनों शासक बनो!" हे आंदोलन छेडले आहे. या आंदोलनाचे उद्घाटन पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष प्रा.व्यंकटेश कसबे सर यांनी महाराष्ट्रातील उस्मानाबाद जिल्ह्यातून केले. 





या आंदोलनाच्या माध्येमातून विविध आंदोलने,अभियाने चालऊन बहुजन समाजाला सामाजिक, आर्थिक, राजकिय गुलामगिरीतून मुक्त करून    अण्णाभाऊ यांच्या विचाराच्या शक्तिवर  शासन कर्ते बनण्याची चेतना निर्माण करण्यात येणार असल्याचे पक्षाच्या वतीने सांगण्यात येत आहे. याच आंदोलनाची सुरूवात आज उस्मानाबाद जिल्ह्यातून 16 ऑगष्ट 2021 ते 16 सप्टेंबर 2021 या दरम्यान संपूर्ण जिल्हाभर चालणा-या, " बहुजन समाज संपर्क अभियानाचे" उद्घाटन करून पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष प्रा.व्यंकटेश कसबे सर यांनी 16 ऑगष्ट 2020 रोजी केली. 






या अभियानांतर्गत पक्षाचे सर्व पदाधिकारी ग्रामीण भागापर्यंत बहुजन समाजाशी परिसंवादाच्या माध्येमातून संपर्क साधनार असल्याचे कळते आहे. बहुजन समाज परिसंवाद अभियानाच्या उद्घाटन पर भाषणात कार्यकर्त्यांना संबोधित करतांना राष्ट्रीय अध्यक्ष प्रा.व्यंकटेश कसबे सरांनी स्पष्ट करून सांगितले की, "16 ऑगष्ट, 1947 रोजी बहुजन क्रांतिनायक अण्णाभाऊ साठे यांनी देशाला मिळालेले स्वातंत्र्य हे ख-या आर्थाने सत्तांतर होते असे वाटत होते. भारताच्या आम जनतेला फसवे स्वप्ने दाखऊन कॉंग्रेसच्या माध्यमातून ब्राम्हणी व्यवस्थेच्या पाईकांनी ब्रिटीशांकडून सत्ता संपादन केली होती. या स्वातंत्र्य नावाच्या सत्तातंरातून दलित, वंचित तथा बहुजन समाजाला काहीही मिळाले नाही, मिळनार नाही असे ठासून सांगत स्वातंत्र्याच्या दुस-याच दिवसी बहुजन क्रांतिनायक अण्णाभाऊ साठे यांनी या स्वातंत्र्यावर मोठा प्रश्न चिन्ह  ऊभा करित ," यह आझादी झुठी है देश की जनता  भुकी है. " असा उद्घोष  मंत्रालयावर प्रचंड असा हजारोंचा मोर्चा काढून केला होता.  आशे स्पष्टीकरण बहुजन समाज संपर्क अभियानाच्या कार्यक्रमातून पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष प्रा.व्यंकटेश कसबे सर यांनी दिले. 








आपल्या भाषणातून आण्णाभाऊंच्या विचारधारेवर संभ्रम निर्माण करणा-या तत्वांचा खरपूस समाचार घेत आण्णाभाऊंनी त्या काळी चालिविलेल्या महाजन आंदोलनाची आजही गरज असल्याचे प्रा.व्यंकटेश कसबे सरांनी स्पष्ट केले. स्वतःला आण्णाभाऊंचे अनुयाई म्हणवून घेणारे आणि कॉंग्रेस, भाजपा या सारख्या प्रस्थापित पक्षांच्या आगले बगलेने फिरणा-यांवर सुध्दा सरांनी आपल्या भाषणातून ताशेरे ओढले. प्रस्थापितांच्या आगेपिछे फिरण्यापेक्षा आण्णा भाऊंनी स्वतःच्या ताकतीवर आंग झाडून या गुलामीतून बाहेर निघण्याचा संदेश दिल्याचे त्यांनी स्पष्ट केले. ब्राम्हणवादी शक्तींनी ऐनकैन प्रकारचे हातकंडे वापरून विभागलेल्या बहुजन समाजाला एकत्र करून आण्णाभाऊंच्या स्वप्नातील ऐरावताची ताकत तयार करण्यासाठी पक्षाच्या पदाधिकारी, कार्यकर्त्यांनी कामाला लागावे असे आव्हान त्यांनी आपल्या भाषणातून केले.



या बहुजन समाज परिसंवाद अभियानाच्या उद्घाटन कार्यक्रमात पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्षासोबत पक्षाचे प्रदेश सचीव तथा उस्मानाबाद जिल्हा प्रभारी दत्ता क्षिरसागर,  प्रा. संतोष बेंबळकर, विनोद गायकवाड,  प्रविण शिंदे इत्यादी पदाधीकारी होते. तर या कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी विशाल देडे, परमेश्वर आडगळे, किरण वाघमारे इत्यादींनी प्रयत्न केले  असे जिल्हा प्रभारी दत्ता क्षिरसागर यांनी सांगितले आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा (0)
To Top