सिधुंसागर ट्रस्ट आणि प्रगती मित्र मंडळ यांची सामाजिक बांधीलकी
वार्ताहर:
आपण या समाजाचे काही देणे लागतो हि भावना मनात ठेवुन नवी मुंबई येथील सिधुंसागर कॅटरर्स चे मालक व हाॅटेल व्यवसायिक कै. प्रदिप सुभाष गोळे याच्यां प्रथम स्मृतिदिनानिमित्त प्रगती मित्र मंडळ महु आणि सिंधुसागर ट्रस्ट याच्यांवतिने सामाजिक बांधीलकी जपत सह्याद्रीतील आडवाटेवर असना-या गावामध्ये दि. 30 ऑगस्ट रोजी जीवनावश्यक वस्तुचे वाटप करण्यात आले.
ॲड. विशाल गोळे याचें मोठे बंधु कै. प्रदिप गोळे हे नेहमीच समाजकार्यात अग्रेसर असायचे, मागील वर्षी दुर्दैवाने त्याचां मृत्यु झाला तेव्हा भावाचे हे कार्य अविरत चालू ठेवत ॲड. विशाल गोळे यांनी संस्थाच्या आणि मंडळाच्या माध्यमातुन सह्याद्रीतील घाटमाथ्यावर असलेल्या मोहरी, सिंगापूर, एकलगाव, कुसारपेठ पासळी या गावामध्ये या सामाजिक संस्थेच्या वतीने गावातील प्रत्येक घरी एक जिवनावश्यक वस्तुचे किट, चटई, चादर अशा स्वरुपात कर्तव्यपर मदत करण्यात आली.
याप्रसंगी संदीप गोळे, सुनील गोळे, भरत गोळे, विकास गोळे, किरण गोळे, रेश्मा गोळे, ॲड. विशाल गोळे तसेच शिलेदार फाऊंडेशन चे सदस्य उपस्थित होते.