उस्मानाबाद येथील अक्षय नाईकवाडी सह असंख्य युवकांचा शिवसेनेत प्रवेश
उस्मानाबाद :- अक्षय नाईकवाडी यांच्यासह शुभम वाणी, शशिकांत कापसे, चैतन्य वाणी, आकाश मंडलिक, दत्ता नाईकवाडी, सुनील थोरात, रत्नदीप गरड, नितीन नाईकवाडी, अजित थोरात या सहकाऱ्यांनी जिल्ह्याचे पालकमंत्री तथा मृद व जलसंधारण मंत्री मा.ना.शंकरराव गडाख-पाटील साहेब, खासदार मा.श्री. ओमप्रकाश राजेनिंबाळकर , आमदार कैलास पाटील आदी मान्यवरांच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश केला. यावेळी सर्वांचा सत्कार करून स्वागत केले.
अक्षय नाईकवाडी यांच्या प्रवाशाने पक्षाला अधिकाधिक बळकटी मिळेल असा विश्वास कळंब उस्मानाबाद आमदार कैलास पाटील यांनी व्यक्त केला.
याप्रसंगी नगराध्यक्ष मकरंद उर्फ नंदूभैय्या राजे निंबाळकर, शिवसेना तालुका प्रमुख सतीशकुमार सोमाणी, युवासेना जिल्हाप्रमुख तथा नगरसेवक अक्षय ढोबळे, गटनेते सोमनाथ गुरव, नितीनबप्पा शेरखाने, युवासेना राज्य विस्तारक तथा नगरसेवक सुरज साळुंके, अविनाश खापे, शहरप्रमुख संजय मुंडे, माजी शहर लप्रमुख प्रवीण कोकाटे, नगरसेवक बाळासाहेब काकडे, पंकज पाटील, एच.एम.देवकते, सुमित बागल, युवासेना उपजिल्हाप्रमुख निलेश शिंदे, युवासेना तालुकाप्रमुख वैभव वीर, युवासेना उपतालुकाप्रमुख बापू थोरात, अंबेजवळगे गण प्रमुख संदिप गोफणे कलीम कुरेशी, जावेद शेख, अतिक सय्यद, दारफळ चे सरपंच ॲड. संजय भोरे, जूनोनीचे माजी सरपंच अमोल मुळे, विभागप्रमुख सौदागर जगताप यांच्यासह शिवसैनिक, युवासैनिक उपस्थित होते.