माणिकबाबा विद्यालयात मराठवाडा मुक्तीसंग्राम दिन उत्साहात साजरा...
( परांडा - विजय शेवाळे )
शेळगावः-परांडा तालुक्यातील माणिकबाबा विद्यालय शेळगांव मध्ये दिनांक 17 सप्टेंबर रोजी मराठवाडा मुक्तिसंग्राम दिन उत्साहात साजरा करण्यात आला.
माणिकबाबा विद्यालयाच्या प्रांगणावर मराठवाडा मुक्तिसंग्राम दिनानिमित्त ध्वजारोहन समारंभ संस्थाध्यक्ष मा.अॅड. सुभाषरावजी मोरे (भाऊ) यांच्या हस्ते उत्साहात संपन्न झाला. या प्रसंगी मा. श्री विष्णु (नाना) शेवाळे सरपंच शेळगांव, माजी प्राचार्य मा. संभाजीराव मोरे, माजी प्राचार्य मा. श्री सुधाकर खरसडे, श्री विजय परदेशी सर, मा. प्राचार्य गुरुदास काळे सर, श्री प्रकाश मस्तुद सर्व शिक्षक व शिक्षकेत्तर सहकारी वृंद यांच्या उपस्थितीत कार्यक्रम पार पडला. यावेळी मा. अॅड सुभाषराव मोरे (भाऊ) यांनी थोडक्यात मार्गदर्शन केले. सर्व कर्मचा-यांना शुभेच्छा दिल्या.सदर कार्यक्रम कोविड-19 च्या सर्व नियमांचे पालन करून संपन्न झाला.