मसूद शेख यांची जमियत -ए -उलेमा हिंद संघटनेच्या मराठवाडा सचिव पदी निवड

0

मसूद शेख यांची जमियत -ए -उलेमा हिंद संघटनेच्या मराठवाडा सचिव पदी निवड 

उस्मानाबाद :-  मुस्लिम समाजातील ज्येष्ठ नेते मसूद शेख यांची जमियात उलेमा हिंद संघटनेच्या मराठवाडा सचिव पदी निवड करण्यात आली जमियत उलेमा महाराष्ट्र गव्हर्निंग कौन्सिल दारुल उलूम सोनोरी जिल्हा अकोला येथे बैठक घेण्यात आली या बैठकीत जमियत उलेमा हिंद संघटनेच्या मराठवाडा सचिवपदी मसूद शेख यांची तर अध्यक्षपदी मौलाना हाफिज मोहम्मद नदीम सिद्दिकी यांची निवड करण्यात आली मसूद शेख हे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेश सचिव म्हणून काम पाहत आहेत त्यांनी सामाजिक व राजकीय प्रवासाची सुरुवात उस्मानाबाद येथे करून महाराष्ट्रात मुस्लिम समाजामध्ये नावलौकिक मिळवले आहे सामाजिक कार्यात सदैव अग्रेसर असलेले व सामाजिक बांधिलकी जपणारा नेता म्हणून मसूद शेख यांची ओळख आहे जमियत उलेमा सारख्या समाजकार्य करणाऱ्या संघटनेने त्यांच्यावर मराठवाडा विभागात सचिवपदी नियुक्ती करून समाज कार्याला व सामाजिक बांधिलकी जपणार्‍या नेत्याला बळ दिले असल्याची भावना समस्त मुस्लिम बांधवातून व नागरिकातून व्यक्त केली जात आहे

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा (0)
To Top