शिक्षण महर्षी ज्ञानदेव मोहेकर महाविद्यालयात ७४ वा मराठवाडा मुक्तीसंग्राम दिन उत्साहात साजरा
कळंब :- शिक्षण महर्षी ज्ञानदेव मोहेकर महाविद्यालयात मराठवाडा मुक्तीसंग्राम दिनाच्या निमित्ताने प्राचार्य डॉ. सुनिल पवार यांच्या हस्ते
ध्वजारोहण करण्यात आले. तसेच मराठवाडा मुक्तीसंग्राम लढ्यात शहीद झालेल्या हुतात्म्यांना अभिवादन करण्यात आले. यावेळी संस्थेचे सचिव आदरणीय डॉ.अशोकराव मोहेकर, उपप्राचार्य एस. एन. लोमटे, प्रा. गोरमाळी, प्रा.संजय मिटकरी यांची प्रमुख उपस्थिती होती.
तसेच शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांच्या वतीने नुकत्याच प्रदीर्घ सेवा पूर्ण करून ( २८ वर्ष ) सेवानिवृत्त झालेल्या श्रीमती बावळे सुरेखा शिवाजी (प्रयोगशाळा सहायक) यांचा सेवानिवृत्तीनिमित्त प्रा.श्रीमती अंजली मोहेकर यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.
या कार्यक्रमाचे सूत्रसंचलन मराठी विभागप्रमुख प्रा.डॉ.डी. ई. गुंडरे यांनी केले.
यावेळी कार्यक्रमासाठी प्रा.डॉ.दीपक सूर्यवंशी, प्रा.डॉ.एम.डी. गायकवाड, डॉ.दत्ता साकोळे, डॉ.एन.जी. साठे, प्रा. के.डब्ल्यू.पावडे , प्रा. संदीप महाजन, श्रीमती बोदर, प्रा. विलास आडसूळ तसेच कनिष्ठ व वरिष्ठ महाविद्यालयातील प्राध्यापकांची प्रमुख उपस्थिती होती.
श्री प्रकाश गायकवाड, श्री संतोष मोरे , श्री संदीप सूर्यवंशी, श्री विनोद खरात व शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले.