google.com, pub-1406548548385211, DIRECT, f08c47fec0942fa0 स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई तुळजापूर येथे मोबाईल चोर मुद्देमालसह ताब्यात

स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई तुळजापूर येथे मोबाईल चोर मुद्देमालसह ताब्यात

0


स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई तुळजापूर येथे मोबाईल चोर मुद्देमालसह ताब्यात

तुळजापूर :-  आज दिनाक 13 ऑक्टोबर 2021 रोजी पोस्टे तुळजापुर हद्दीत श्री.तुळजाभवानी नवरात्र महोत्सवात एक संशयित इसम नामे बेग रफ़ीक ऊर्फ बाबा रशिद रा. बलभीम नगर , पेठ बीड ता.जि. बीड यास ताब्यात घेऊन त्याच्या तब्यातून खालील वर्णनाचा मुद्देमाल जप्त करुन  पोस्टे तुळजापुर  गुरन. 354/2021 कलम 379 भादवि गुन्ह्या उघडकीस आणला आहे. 

बेग यांच्याकडून सॅमसंग कंपनीचा मोबाइल किंमत 17,000/- रुपये ,  रियल मी कंपनीचा मोबाईल किंमत 8,000/- रुपये व एम आय कंपनीचा मोबाईल कींमत 7,500/- रुपये असा एकूण 32,500/- रुपये चा मुद्देमाल.
ताब्यात घेतला आहे . अशी माहिती स्थानिक गुन्हे शाखा पोलीस उपनिरीक्षक पी व्ही माने यांनी दिली आहे.

ही कारवाई स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक गजानन घाडगे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरीक्षक पी व्ही माने , पो ना  सय्यद , पो ना चव्हाण , पो कॉ जाधवर , पो कॉ मरलापल्ले , चालक पो कॉ गोरे यांनी पुर्ण केली आहे

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा (0)
To Top