google.com, pub-1406548548385211, DIRECT, f08c47fec0942fa0 वडार गल्लीतील लसीकरण मोहिमेस उत्स्फूर्त प्रतिसाद, २३७ जणांनी घेतला लाभ

वडार गल्लीतील लसीकरण मोहिमेस उत्स्फूर्त प्रतिसाद, २३७ जणांनी घेतला लाभ

0

वडार गल्लीतील लसीकरण मोहिमेस उत्स्फूर्त प्रतिसाद,२३७ जणांनी घेतला लाभ

उस्मानाबाद :-  आज युवराज भैया कुऱ्हाडे विचारमंच यांच्या वतीने नगर परिषद शाळा क्रमांक-३ वडार गल्ली,उस्मानाबाद येथे शासकीय रुग्णालय व नागरी प्राथमिक आरोग्य केंद्र क्र.१ यांच्या सहकार्याने लसीकरण मोहिम राबविन्यात आली या मोहिमेत वडार गल्ली,पाथ्रुड चौक,झोरी गल्ली येथील परिसरातील २३७ नागरिकांचे लसीकरण करण्यात आहे या परिसरात सर्वसामान्य मजूर वर्ग मोठ्या प्रमाणात आहे यांचे लसीकरण करने महत्वाचे होते यासाठी युवराज कुऱ्हाडे यांनी शासकीय रुग्णालय यांच्याशी संपर्क साधुन ही मोहिम राबविली या लसीकरण मोहिमेत कोव्हीड-19 चे कोव्हीसील्ड पहिला व दूसरा डोस देण्यात आला यावेळी डॉ. शकील अहमद खान,वैद्यकीय अधिकारी व शशिकांत कुऱ्हाडे यांच्या हस्ते या लसीकरण मोहिमेचे उद्घाटन करण्यात आले यावेळी शीतल गायकवाड़,एस.पी.शेटे,अनिल मगर,रत्नाकर पाटील, सुहास चव्हाण,छाया बाबर आदि वैद्यकीय कर्मचारी यांच्या सहकार्याने ही शिबीर संपन्न झाली तसेच अभय तांबे,अनिल कुऱ्हाडे,शिवलाल कुऱ्हाडे,अजय साळुंके,प्रवीण पवार,अविनाश पारवे, फूलचंद देवकर,राजू गायकवाड़,रोहन धोत्रे,गंगाधर पवार, विक्रम हुलगुंडे,अंकुश मुद्दे,आकाश यमपुरे, शुभम मुद्दे आदिंनी या लसीकरण मोहिमेसाठी परिश्रम घेतले

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा (0)
To Top