अखेर पीक नुकसानीचे पंचनामे सुरू.
(प्रतिनिधी) सांगवी (का)
मागील महिन्यात 24 ते 28 सप्टेंबर दरम्यान तुळजापूर तालुक्यातील सांगवी काटी येथे झालेल्या अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांच्या पिकांचे अतोनात नुकसान झाले होते. परंतु महसूल प्रशासन यांच्या वतीने तुळजापूर तालुक्यातील इटकळ व सलगरा या दोनच मंडळात अतिवृष्टी झाली आहे असे परिपत्रक काढून. या दोनच मंडळाचे पंचनामे करण्याचे आदेश महसूल प्रशासनाने दिले होते. प्रशासनाच्या या तुघलकी निर्णय यामुळे शेतकऱ्यांमध्ये प्रचंड रोष निर्माण झाला होता. या अतिवृष्टीमुळे सांगवी काटी ते नॅशनल हायवे ला जोडणाऱ्या मुख्य रस्त्यावर असणारा पूल पाण्याखाली गेल्यामुळे दोन दिवस गावाचा संपर्क तुटला होता.
जर सांगवी काटी परिसरात अतिवृष्टीत झाली नाही तर गावाचा संपर्क तुटलाच कसा असे अनेक प्रश्न शेतकऱ्यांकडून महसूल दरबारी आपले गऱ्हाणे मांडण्यात आले. गावातील शेतकऱ्यांनी व गावकऱ्यांनी तालुक्यातील मंगरूळ गटांमध्ये येणाऱ्या सांगवी काटी गावाचा अतिवृष्टी मध्ये समावेश करून पंचनामे करावे अशी मागणी ग्रामपंचायतीच्या वतीने माननीय तहसीलदार यांना पत्राद्वारे करण्यात आली होती. या मागणीची दखल घेऊन माननीय तहसीलदार साहेबांनी मंगरूळ गटामध्ये असणाऱ्या सांगवी का या गावाचे पीक नुकसानीचे पंचनामे करण्याचे अखेरआदेश दिले. यानंतर गावातील नुकसान झालेल्या शेतकर्यांचे पंचनामे ग्रामसेवक कृषी सहाय्यक तलाठी यांनी अतिवृष्टीमुळे झालेल्या शेतकऱ्यांच्या पिकांचे नुकसानीचे पंचनामे करण्यास सुरूवात केली. यावेळी ग्रामसेवक बापूसाहेब दराडे कृषी सहाय्यक संजय बनसोडे उपसरपंच मिलिंद मगर रघुनाथ मगर महादेव माळी, शेतकरी जगन्नाथ मगर राजेंद्र मगर व इतर शेतकरी उपस्थित होते.