google.com, pub-1406548548385211, DIRECT, f08c47fec0942fa0 अपघातस्थळावरुन दोन पिस्टलासह एक आरोपी अटकेत

अपघातस्थळावरुन दोन पिस्टलासह एक आरोपी अटकेत

0


उस्मानाबाद तालुक्यातील बेंबळी पोलीस ठाणे हद्दीत: समुद्रवाणी येथे उस्मानाबाद ते औसा रस्त्यावर दि. 08 ऑक्टोबर रोजी 06.00 ते 07.00 वा. दरम्यान अर्टीगा कार कार क्र. एम.एच. 06 बीएम 4833 चा व मोटारसायकल क्र. एम.एच. 25 ई 5305 चा अपघात झाल्याची बातमी बेंबळी पो.ठा. च्या पथकास मिळाली. यावर बेंबळी पो.ठा. चे सपोनि- श्री. शेंडगे यांसह पथक घटनास्थळी रवाना झाले. या अपघातात मोटारसायकल वरील वसंत श्रीरंग जाधव, रा. समुद्रवाणी, ता. उस्मानाबाद व त्यांच्या सोबतचे खंडु पांडुरंग कुंभार, रा. लासोना, ता. उस्मानाबाद हे दोघे गंभीर-किरकोळ जखमी झाले होते. पथकाने त्या दोघांना रुग्णालयात उपचारासाठी पाठवून अपघात स्थळावरील नमूद कारची तपसणी केली असता कारमधील चालक सिटच्या मागच्या बाजूच्या कप्प्यात मॅकझीन- काडतुस विरहीत दोन पिस्टल आढळुन आल्या.

यावर ही बातमी वरीष्ठ अधिकाऱ्यांना कळवून मा. पोलीस अधीक्षक श्रीमती नीव जैन व अपर पोलीस अधीक्षक श्री. नवनित कॉवत यांच्या मार्गदर्शनाखाली नमूद दोन्ही पिस्टल जप्त करुन कार चालक- नरेश तौर, रा. औसा यास अटक केली असून कारमधील त्याच्या अन्य साथीदारांसह पिस्टलाच्या मॅगझीन- काडतूसाचा पोलीस शोध घेत आहेत. सदर प्रकरणी पोलीसांनी सरकारतर्फे दिलेल्या प्रथम खबरेवरुन बेंबळी पो.ठा. येथे भा.दं.सं. कलम- 279, 337, 338, 34 सह मो.वा.का. कलम- 134, 184 सह शस्त्र कायदा कलम- 3, 25 अंतर्गत गुन्हा क्र. 171 / 2021 हा नोंदवण्यात आला आहे. अशी मागणी पोलीस माहिती विभाने दिली आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा (0)
To Top