google.com, pub-1406548548385211, DIRECT, f08c47fec0942fa0 विमा कंपनीचे अधिकारी जिथे दिसतील तिथे डांबून ठेवू : रामजीवन बोंदर

विमा कंपनीचे अधिकारी जिथे दिसतील तिथे डांबून ठेवू : रामजीवन बोंदर

0


विमा कंपनीचे अधिकारी जिथे दिसतील तिथे डांबून ठेवू : रामजीवन बोंदर

विमा कंपनीचे अधिकारी जिथे दिसतील तिथे डांबून ठेवू असा इशारा  शरद जोशी प्रणित शेतकरी संघटनेचे मराठवाडा अध्यक्ष रामजीवन बोंदर यांनी दिला आहे ते सांजा येथे  केंद्र व राज्य शासनाच्या विरोधात स्वतंत्र भारत पक्ष आणि शेतकरी संघटनेच्या वतीने आज दिनांक ५ नोव्हेंबर रोजी  मुठमाती कार्यक्रम प्रसंगी बोलत होते.

  पुढे बोलताना बोंदर म्हणाले की उस्मानाबाद जिल्ह्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे शेतकरी हा प्रचंड आर्थिक अडचणीत असताना सुद्धा केंद्र व राज्य सरकार यांनी कसलाच विचार न करता तुटपुंजी मदत देऊन बोळवण केली आहे

    विमा कंपनीने गतवर्षी सुद्धा शेतकऱ्यांना विमा दिलेला नाही यावर्षी विमा कंपनीने शेतकऱ्यांकडे साफ दुर्लक्ष करत विमा देण्यासाठी टाळाटाळ केल्याचे स्पष्ट असतानासुद्धा दोन्ही सरकारकडून मात्र शेतकऱ्यांना दिलासा देण्याचा प्रयत्न देखील केला नाही शेतकऱ्यांनी हजारो कोटी विमा भरलेला असताना देखील सरकारकडून दिलेली नुकसान भरपाई अत्यंत तुटपुंजी आहे शेतकऱ्यांचे शंभर टक्के नुकसान झाले असून डिसेंबर अखेरपर्यंत विमा कंपन्यांनी शेतकऱ्यांच्या खात्यावर विमा जमा केला नाही तर विमा कंपनीचे अधिकारी जिथे दिसतील तिथे डांबून ठेवण्याचा इशारा रामजीवन बोंदर यांनी दिला असून सरकारच्या विरोधात सुद्धा मोठे आंदोलन उभा करणार असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले

   या मूठमाती कार्यक्रमात शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष नवनाथ जाधवर , युवक जिल्हाध्यक्ष सचिन देशमुख , जिल्हा कार्याध्यक्ष श्याम लावंड , कळंब तालुका अध्यक्ष विनोद बिक्कड , पवन बाराते , जिल्हा ऊसतोड कामगार अध्यक्ष संतोष राठोड , उस्मानाबाद तालुका अध्यक्ष प्रशांत सूर्यवंशी ,  संदीप माळकर,  बालाजी मोहिते , प्रमोद सूर्यवंशी , सुहास नायकल,  प्रदीप नायकल , प्रदीप सूर्यवंशी , इरफान शेख ,  अविनाश नायकल , हरिचंद्र गिरी , शिवाजीराव काळे , दत्तू पाटील , सानप जोशी , भारत पाटील , अंगद मुळे , लक्ष्मण लोंढे , राजेश कदम , लक्ष्मण कदम , युवराज वाघमारे , ॲड.नेताजी गरड यांचेसह शेतकरी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.

****************
Ad

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा (0)
To Top