ओबीसी समाज मेळाव्याला पंकजाताई मुंडे उस्मानाबादेत येणार : पांडूरंग लाटे
उस्मानाबाद (प्रतिनिधी) ओबीसी समाजाचे आरक्षण,शासनदरबारी प्रलंबित असणारे विविध प्रश्न मार्गी लावण्यासाठी उस्मानाबादेत पुढील महिन्यात ओबीसी मेळावा घेतला जाणार आहे. या मेळाव्याला पंकजाताई मुंडे उपस्थित राहणार आहेत. अशी माहिती भाजपाचे नेते पांडुरंग लाटे यांनी दिली आहे.
ओबीसी समाजाचे राजकीय आरक्षण रद्द झाल्याच्या निषेधार्थ भारतीय जनता पार्टी आणि ओबीसी समाज बांधवांच्या वतीने उस्मानाबाद येथील छत्रपती शिवाजी महाराज चौकामध्ये १४ डिसेंबरला निदर्शने करून निषेध नोंदविण्यात आला.
परळी दौऱ्यावर असलेल्या राज्याच्या माजी महिला बाल विकास मंत्री पंकजाताई मुंडे यांच्या यशश्री निवासस्थानी पांडुरंग लाटे यांनी आज दिनांक १९ डिसेंबर रोजी भेट घेऊन चर्चा केली.
२६ जानेवारी २०२२ नंतर आपण राज्यभर दौरे करणार असून या दौऱ्यामध्ये उस्मानाबादला येऊन ओबीसी मेळाव्याला मार्गदर्शन करू असे आश्वासन पांडुरंग लाटे यांच्यासह उस्मानाबादच्या शिष्टमंडळाला पंकजाताई मुंडे यांनी दिल्याचे सांगण्यात आले.