उस्मानाबाद जिल्हा कबड्डी असोसिएशन तर्फे किशोर किशोरी गट निवड चाचणी स्पर्धेत जिल्ह्यातून कानेगाव येथील श्री संत मारुती महाराज विद्यालयाने प्रथम क्रमांक पटकावला
लोहारा/प्रतिनिधी
उस्मानाबाद जिल्हा कबड्डी असोसिएशन तर्फे किशोर किशोरी गट निवड चाचणी स्पर्धा चिखली तालुका जिल्हा उस्मानाबाद येथे पार पडली
या निवड चाचणी स्पर्धेमध्ये उस्मानाबाद जिल्ह्यातून श्री संत मारुती महाराज विद्यालय कानेगाव ता.लोहारा या प्रशाले चा कबड्डीचा किशोरी गट प्रथम क्रमांकाने विजयी झाला
चिखली गावचे प्रथम नागरिक सरपंच यांच्या हस्ते किशोरी संघास ट्रॉफी, पुष्पगुच्छ देऊन सन्मानित केले व पुढील स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या. या विजयामध्ये संघाचे मार्गदर्शक म्हणून व्ही.एन.
क्षीरसागर, व्यवस्थापक महादेव कदम, निकिता जावळे, यांनी सहकार्य केले
या विजया बद्दल लोहारा राष्ट्रवादी शिक्षक संघाचे अध्यक्ष गोपीनाथ मैदाड सर यांनी अभिनंदन केले. या विजयाबद्दल संस्था अध्यक्ष व्यंकटराव लोभे, सचिव दिलीप कदम, कोषाध्यक्ष मोरे, प्रशाले चे मुख्याध्यापक निकम सर, पवार, भोसले सर, पवार के,एस वळवी सर, शिंदे, गाटे, शेवाळकर, श्रीमती मुस्कावाड मॅडम, कांबळे, बालाजी सूर्यवंशी यांनी सर्वांनी अभिनंदन केले.