निष्क्रिय नगरसेवकांमुळेच कायमस्वरूपी पाणीपुरवठा योजना रखडली - आमदार ज्ञानराज चौगुले

0

निष्क्रिय नगरसेवकांमुळेच कायमस्वरूपी पाणीपुरवठा योजना रखडली - आमदार ज्ञानराज चौगुले


लोहारा/प्रतिनिधी


लोहारा शहराला माकणी धरणाचे पाणी मिळावे, यासाठी आपण प्रयत्न केले. परंतु निष्क्रिय नगरसेवकांमुळेच कायमस्वरूपी पाणीपुरवठा योजना रखडली असल्याचा आरोप करीत दीड वर्षाच्या कालावधीत ही योजना कार्यान्वित करून शहरातील पाणीटंचाई दूर करू, असे आश्वासन आमदार ज्ञानराज चौगुले यांनी दिले.

 लोहारा नगरपंचायतची निवडणूक होत आहे. शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस आघाडीच्या उमेदवारांच्या प्रचारार्थ शहरातील शिवाजी चौक येथे आयोजित केलेल्या जाहीर सभेत आ.चौगुले बोलत होते. 

या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते नागण्णा वकील होते. तर प्रमुख म्हणून राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अमोल मिटकरी, राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश प्रवक्ते सुभानआली शेख, शिवसेना तालुकाप्रमुख मोहन पणुरे, शहरप्रमुख सलीम शेख, युवा सेना तालुकाप्रमुख अमोल बिराजदार, उमरग्याचे माजी नगराध्यक्ष अ.रज्जाक अत्तार, अबुलवफा कादरी उपस्थित होते. पुढे बोलताना आमदार चौगुले म्हणाले की, शहरात पाणीटंचाई निर्माण होऊ नये, यासाठी आपण प्रत्येक प्रभागात विंधन विहिर घेऊन काही अंशी पाणीटंचाई दूर केली आहे. माकणी धरणातून शहराला कायमस्वरूपी पाणीपुरवठा योजना कार्यान्वित करण्यासाठी नगरपंचायतची सत्ता शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस आघाडीच्या हाती द्या, असे आवाहन करून ही योजना दीड वर्षात पूर्ण करण्याचे आश्वासन त्यांनी दिले. 


अर्थ खाते राष्ट्रवादी काँग्रेसकडे आहे, जिल्ह्याचे पालकमंत्री, खासदार, आमदार शिवसेनेचे आहेत. त्यामुळे शहराच्या विकासासाठी कुठल्याच प्रकारचा निधी कमी पडणार नाही. शिवाय माझा आमदार निधीही उपलब्ध करून देऊ. 

मात्र त्यासाठी राष्ट्रवादी, शिवसेना आघाडीच्या उमेदवारांना निवडून देण्याचे आवाहन आमदार अमोल मिटकरी यांनी केले. यावेळी सुधाकर पाटील, अविनाश माळी, जालिंदर कोकणे, विजय लोमटे, जगन्नाथ पाटील, पंडित पाटील, अभिमान खराडे, आयुब अब्दुल शेख, राष्ट्रवादी काँग्रेस शहराध्यक्ष आयुब हबीब शेख, दिपक रोडगे, मयुरी बिराजदार, शामल माळी, पौर्णिमा जगदिश लांडगे, सुमन रोडगे, वैशाली खराडे, शम्माबी शेख, शरीफा सय्यद, अक्षता लांडगे, गौस मोमीन, श्रीकांत भरारे, यांच्या कार्यकर्ते उपस्थित होते.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा (0)
To Top