छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याची विटंबना! उस्मानाबादेत कर्नाटक सरकारच्या पुतळ्याला चपलेचा हार.

0

 छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याची विटंबना  छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याची विटंबना 

उस्मानाबादेत कर्नाटक सरकारच्या पुतळ्याला चपलेचा हार.... 

उस्मानाबाद (प्रतिनिधी) कर्नाटक राज्यात छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याची विटंबना केल्याच्या निषेधार्थ उस्मानाबाद कर्नाटक राज्याच्या प्रतीकात्मक पुतळ्यास चपलेचा हार घालून निंदनीय घटनेचा तीव्र शब्दात सामूहिक रित्या आंदोलन करून निषेध करण्यात आला. 

        उस्मानाबाद शहरातील शिवराज्यभिषेक सोहळा समिती व शिवप्रेमींनी एकत्र येत आज (दि १८ डिसेंबर)  कर्नाटक राज्याच्या प्रतिमात्मक पुतळ्यास चप्पल चा हार घालून कर्नाटक झेंड्याचे दहन केले.

       यावेळी शिवप्रेमींनी कर्नाटक सरकारच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करत निदर्शने केली. यावेळी इतिहास अभ्यासक जयराज खोचरे म्हणाले की, कर्नाटकचा सातबारा आज सुद्धा छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावाने निघतो. कर्नाटक राज्यामध्ये महाराजांचे आजच्या वंशाचे जे पूर्वज आहेत. ते महाराजांना देवासमान मानत होते. परंतु आजचे जे समाजकंटक आहेत ते लोक त्यांच्याच वडिलांचे वंशज आहेत का दुसरे कोणाचे असा प्रश्न त्यांच्या वर्तणुकीतून आणि वागणुकीतून आता पडला आहे. उडप शिमोगरा केदी या ठिकाणी महाराजांच्या हयातीमध्ये बेलवडीला महाराजांचे पुतळे स्वतः स्थापन केलेले आहेत. आज त्यांचेच लोक महाराजांचा अपमान करत असतील तर नक्कीच त्या पूर्वजांच्या औलादी नाहीत. आजचा कर्नाटक शहाजीराजे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या मुळेच अबाधित राहिलेला आहे याची जाण कुठेतरी ठेवून वागावे अन्यथा त्यांचे नामोनिशाण देखील राहणार नाही असा इशारा त्यांनी प्रसारमाध्यमांसमोर बोलून दाखवला 

   शिवप्रेमी शशिकांत खुने म्हणाले की, कर्नाटक सरकार कडून वारंवार होणारा अन्याय शिवभक्त सहन करून घेणार नाहीत. कर्नाटक सरकार अशा भ्याड लोकांना पाठीशी घालत आहे. त्यासाठीच आज आम्ही निषेध करत आहोत विटंबना करणाऱ्या लोकांना फाशीची शिक्षा झाली पाहिजे आणि कर्नाटक सरकार याला टाळाटाळ करत असेल तर यापुढे त्यांना तीव्र आंदोलने शिवभक्त उत्तर देतील.

       आजच्या आंदोलनामध्ये शिवभक्त आणि शिवप्रेमींनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून कर्नाटक राज्यातील समाजकंटकांचा निषेध नोंदवला.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा (0)
To Top