उस्मानाबाद:- थोर समाज सुधारक राष्ट्रसंत गाडगेबाबा यांच्या स्मृतिदिनानिमित्त फुले शाहू आंबेडकर उद्यान कृती समिती व समस्त समाज बांधव यांच्या वतीने सामुदायिक अभिवादन करण्यात आले सर्वप्रथम नगरसेवक तथा डीपीडीसी सदस्य सिद्धार्थ बनसोडे व नगरसेवक तथा गटनेते सोमनाथ गुरव यांच्या हस्ते राष्ट्रसंत गाडगेबाबा यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून सामुदायिक बुद्ध वंदना घेण्यात आली, संत गाडगेबाबा यांच्या विचारांचे स्मरण मान्यवरांनी मनोगतातून व्यक्त केले गोपाला गोपाला देवकी नंदन गोपाला या गजराने संत गाडगेबाबा यांच्या विचारांना उजाळा देण्यात आला या अभिवादन कार्यक्रमात प्रामुख्याने नगरसेवक सिद्धार्थ बनसोडे,नगरसेवक सोमनाथ गुरव,महेंद्र धोंगडे, सुरेखा ताई काशिद, बाबासाहेब बनसोडे,धनंजय वाघमारे,गणेश रानबा वाघमारे,संजय गजधने, लक्ष्मण माने,पत्रकार पांडुरंग मते, बाबासाहेब जानराव, स्वराज जानराव,पत्रकार विजय बनसोडे, मुकेश मोटे,नामदेव वाघमारे,सतिश लोंढे,श्री पवार,महादेव माळी,शाम तेरकर,नाना भिडे,इतर मान्यवर उपस्थित होते महिला भगिनी इतर समाज बांधव व विद्यार्थी मोठ्या संख्येने सहभागी होते.
फुले शाहु आंबेडकर उद्यान कृती समिती मार्फत राष्ट्रसंत गाडगेबाबा यांच्या स्मृतिदिनानिमित्त विनम्र अभिवादन
डिसेंबर २०, २०२१
0
Tags
अन्य ॲप्सवर शेअर करा