सरस्वती माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय तामलवाडी येथे महापरिनिर्वाण दिन उत्साहात साजरा

0

 तामलवाडी:- दि  6 डिसेंबर येथील सरस्वती विद्यालय व उच्च माध्यमिक विद्यालय तामलवाडी तालुका तुळजापूर जिल्हा उस्मानाबाद या शाळेत घटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या  प्रतिमेचे पूजन करून महापरिनिर्वाण दिन साजरा करण्यात आला.या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्राचार्य सुभाष जाधव तर प्रमुख पाहुणे त्र्यंबकेश्वर बहुउद्देशीय शिक्षण प्रसारक मंडळाचे सचिव व तुळजापूर तालुका कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक यशवंत (अण्णा) लोंढे ,पर्यवेक्षक गणेश हलकरे ज्येष्ठ शिक्षक औदुंबर माडजे यांच्या हस्ते  डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले . तर सामाजिक अंतर ठेवून  शिक्षक चंद्रकांत साळुंखे  यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक करून सुहास वडणे यांनी महापरिनिर्वाण दिनाच्या कार्यक्रमाविषयी   सविस्तर माहिती दिली. तसेच प्रशालेतील गुणवंत विद्यार्थी मसूते श्रीशैल महादेव यांनी "*चीनी छोडो जीवन को मधुर बनाओ* " या हिंदी मध्ये राष्ट्रीय स्तरावर ऑनलाइन निबंध स्पर्धेत द्वितीय क्रमांक आल्याबद्दल त्याचा 5000/- रुपये, स्मृतिचिन्ह, पुष्पगुच्छ देऊन त्याचा सत्कार करण्यात आला. व  यावेळी ज्येष्ठ शिक्षक औदुंबर माडजे ,चंद्रकांत साळुंखे , चांगदेव  सावळे, प्रभाकर जाधव ,शिवकुमार सिताफळे, सुहास वडणे  ,महादेव मसुते,  महादेव माळी , लक्ष्मण पाटील, विनोद कुंभार , प्रशांत चुंगे , बालाजी साठे , गिरीश जाधव ,योगेश राऊत, श्री गणेश स्वामी ,बालाजी रणसुरे, दत्तू कोकरे ,सुनील पाटील,  महिला शिक्षिका श्रीमती शाहिदा पिरजादे , मनिषा गिरे, मनीषा सावंत ,विठाबाई पाटील तसेच  शिक्षक एस. डी. वडणे यांनी सूत्रसंचालन केले या कार्यक्रमास शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते. सर्व उपस्थितांचे एम.एम. मसुते यांनी आभार मानले

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा (0)
To Top