google.com, pub-1406548548385211, DIRECT, f08c47fec0942fa0 जिल्हा परिषदेच्या पशुसंवर्धन विभागातर्फे किसान कार्ड योजना सुरू

जिल्हा परिषदेच्या पशुसंवर्धन विभागातर्फे किसान कार्ड योजना सुरू

0




  उस्मानाबाद,दि.28(जिमाका):- जिल्हा परिषदेच्या पशुसंवर्धन विभागामार्फत किसान क्रेडिट कार्ड योजनेचा शुभारंभ करण्यात आला आहे.किसार क्रेडिट अंतर्गत जिल्हयातील पशुपालकांना त्यांचा विमा संरक्षण कवच,जनावरांसाठी चारा.औषधे आणि पशुखाद्यासाठी सात टक्के दराने कर्ज उपलब्ध करण्यात आला आहे.             

                      
कर्ज त्या त्या वर्षात नियमित परतफेड केल्यास दोन टक्के सुट मिळणार आहे.त्यावर किसान क्रेडिट कार्डावर तीन टक्के सुट मिळणार आहे.आयुक्त पशुसंवर्धन यांच्या मार्गदर्शक सूचनानुसार या योजनेसाठी दि.15 फेब्रुवारी-2022 पासुन ऑनलाईन (संगणकीय) प्रणालीद्वारे नोंदणी करण्यात येणार आहे.


सर्व पशुपालकांनी नमुद विहित वेळेत किसान क्रेडिट कार्डासाठी अर्ज करावेत,असे आवाहन जिल्हा परिषदेचे सभापती कृषी पशुसंवर्धन आणि दुग्धशाळा समितीचे दत्ता सांळुके यांनी केले आहे.
*****

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा (0)
To Top