उस्मानाबाद :- छत्रपती शिवाजी महाराजांच्या 392 व्या जयंती निमित्त उस्मानाबाद शहरातील महादेव गल्ली येथील राजे संभाजी महाराज तरुण गणेश मंडळ आयोजित करण्यात आलेल्या शिवजयंती निमित्त शिवाजी महाराजांच्या प्रतिमेचे पूजन राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी नेते संजय (मामा) निंबाळकर व बालाजी काकडे यांच्या हस्ते करण्यात आली तसेच शरदचंद्रजी पवार साहेब फाऊंडेशन मार्फत विचारांची शिवजयंती या संकल्पनेनुसार महादेव गल्ली येथे पहिले वाचन कट्ट्याचे अनावरण करण्यात आले राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष बबलू भाई शेख , विलास लोकरे, नागेश जगदाळे, शेखर घोडके, कैलास काकडे, विनोद काकडे, रणवीर इंगळे, रामभाऊ काकडे, नवनाथ शेरकर, बालाजी गुरव, सुनील पवार
विजय विंचुरे, गणेश गुळमिरे, सूरज कोळपे, विवेक काकडे, ऋषी बोंदर, नितिन कदम, केतन पूरी, ओंकार राजेनिंबाळकर, धीरज मोटे, अविनाश टकले,सूरज शेरकर गणेश साखरे, तसेच सर्व ज्येष्ठ मंडळी व मंडळाचे सर्व सदस्य तसेच शरदचंद्रजी पवार साहेब फाऊंडेशन चे सदस्य
उपस्थित होते.
तसेच फाऊंडेशन मार्फत आवाहन करण्यात आले शिवजयंती निमित्त विचाराची शिवजयंती या संकल्पनेनुसार ज्या भागात वाचन कट्ट्याची मागणी होईल त्या भागात वाचन कट्टा उभा करण्याचा मानस आहे तरी सर्वांनी याचा लाभ घ्यावा असे आवाहन फाउंडेशन चे शेखर घोडके व रणवीर इंगळे यांनी केले आहे.