google.com, pub-1406548548385211, DIRECT, f08c47fec0942fa0 पराक्रमा पलीकडले छत्रपती शिवराय समजून घ्या - प्रमोद भोंग

पराक्रमा पलीकडले छत्रपती शिवराय समजून घ्या - प्रमोद भोंग

0
लोहारा/प्रतिनिधी 
छत्रपती शिवरायांचा इतिहास हा फक्त ढाल आणि तलवारी पर्यंत मर्यादित न ठेवता पुढील अमर्यादित इतिहास आजच्या मावळ्यांनी समजून घेण्याची गरज आहे असे प्रतिपादन शिवव्याख्याते प्रमोद भोंग यांनी केले. लोकमान्य टिळक गणेश मंडळ, महाजन गल्ली उस्मानाबाद यांनी आयोजित केलेल्या शिवजन्मोत्सव सोहळ्यात ते बोलत होते.

 पुढे बोलताना ते म्हणाले की छत्रपती शिवराय एक विचारधारा आहे ती अंगात भिनवून आपण आपल्या आयुष्याचं सोनं करू शकतो. शिवरायांनी स्थापन केलेली महसूल यंत्रणा, सारावसुली, शेतकऱ्यांसाठी पाणीपुरवठा योजना,तलाव निर्मिती, रयतेच्या हिताची बाबत दिलेल्या सूचना यातून शिवरायांची कारकीर्द स्पष्ट होते.

तलवारीची जागा आता लेखणीने घ्यायला हवी हाच संदेश प्रमोद भोंग यांनी आपल्या व्याख्यानातून दिला. या शिवजन्मोत्सव सोहळ्यास अध्यक्ष म्हणून विष्णू इंगळे उपाध्यक्ष नागेश जगदाळे सचिव तेजस कुलकर्णी ओमकार शेरकर, अशोक मोरे,दादा इंगळे, गजानन भोसले,उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आयोजक सुरज शेरकर यांनी केले

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा (0)
To Top