उस्मानाबाद : देशी कट्ट्यातून गोळी सुटल्याने महिला गंभीर जखमी!

0
उस्मानाबाद : देशी कट्ट्यातून गोळी सुटल्याने महिला गंभीर जखमी! 

उस्मानाबाद जिल्ह्यातील उमरगा तालुक्यातील तालुक्यात तुरोरी राष्ट्रीय महामार्गावरील ज्ञानेश्वर श्रीमंत जाधव यांच्या घराजवळ देशी कट्ट्यातून गोळी लागून पूजा सागर जाधव ( वय २५ ) ही महिला गंभीर जखमी झाली आहे . सदरची ही घटना शुक्रवारी ( १८ ) रात्रीच्यासुमारास उघडकीस आली .

याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार , ज्ञानेश्वर जाधव यांचे घर राष्ट्रीय महामार्गावर आहे . मंगळवारी ( १५ ) सायंकाळी सून पूजा जाधव घरासमोरील अंगणात कचरा झाडत असताना त्यांच्या नजरेस पिस्तूल पडले. त्यावेळी पुजा जाधव यांना ते पिस्तूल महिला गंभीर जखमी वाटल्यामुळे खेळण्यातील असल्यासारखे ते हातात घेवून पाहत असताना अचानक व अनावधानाने पिस्तूलातून गोळी झाडली गेली व गोळी छातीखाली पोटात लागून पूजा जाधव गंभीर जखमी झाल्या आहेत. त्यांच्यावर सोलापूर येथील यशोधरा हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत  सदरील घटना घडून चार दिवस उलटून गेल्या नंतर हि याचा सुगावा पोलिसांना लागल्या असल्याने पोलिस हवालदार वाल्मिक कोळी यांच्या फिर्यादीवरून अज्ञात व्यक्ती आणि जखमी महिलेविरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे . 

घटनास्थळी उपविभागीय पोलिस अधिकारी रमेश बरकते यांनी धाव घेत चौकशी सुरू केली आहे . घटनास्थळी सहायक पोलिस निरीक्षक महेश क्षीरसागर , एस बी बरकते , पोलिस पाटील प्रशांत पाटील यांच्यासह पोलीसांचा फौज फाटा दाखल झाला आहे. 

अशी माहिती उस्मानाबाद 'दिव्य मराठी' वृत्तपत्रांमध्ये प्रकाशित करण्यात आली आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा (0)
To Top