यूनानी दिवस मस्सी उल मुल्क यूनानी हाकिम आजमल खान यांच १५४ वा जन्म दिवस साजरा

0

उस्मानाबाद - जागतिक यूनानी दिवसच्या निमित्ताने नागरी प्राथमिक आरोग्य केंद्र वैराग रोड उस्मानाबाद व जिल्हा रुग्णालय आयुष विभाग यांच्या संयुक्त विद्यमानाने जागतीक यूनानी दिवस मस्सी उल मुल्क यूनानी हाकिम आजमल खान यांच १५४ वा जन्म दिवस साजरा करण्यांत आला दर वर्षी 11 फेब्रुवारीला शासना तर्फे हा दिवस साजरा करण्यांत येतो . त्यानिमीत्ताने येथे आरोग्य शिबीर घेण्यात आले व विचारवांतचे यूनानी उपचार बाबत विचार माडण्यांत आले आहे. 

शिबिर चे उद्‌घाटक डॉ.धनंजय पाटील जिल्हा शल्य चिकित्सक  यांच्या हस्ते करण्यात आले प्रमुख  पाहुणे डॉ नितीन बोडके  जिल्हा अरोग्य अधिकारी व निवासी वैद्यकीय अधिकारी डॉ.सी.के ऐवळे, निवासी वैद्यकीय अधिकारी डॉ.सचिन देशमुख डॉ. परळीकर जिल्हा आयुष्य अधिकारी युनानी तज्ञ डॉक्टर शकील अहमद खान डॉ.अबरार देशमुख, फारूक काझी श्रीमती गायकवाड, बाळासाहेब काकडे, श्रीमती शीतल गायकवाड , शिंदे मगर. चव्हाण समीर बनसोडे श्रीमती नीता, श्रीमती शेटे ANM, रत्नाकर पाटील हो सर्व आशाताई  उपस्थित होत्या

डॉ. शकील अहमद खान  वैद्यकीय अधिकारी यांनी हकीम अजमल खान व जागतिक यूनानी दिवस बाबत माहिती दिली.

डॉ.मुरनाल धावारे,डॉ. सोनाली शिंदे  वैद्यकीय अधिकारी यांनी कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी परिश्रम घेतले.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा (0)
To Top