तेरणा अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या ५ विध्यार्थाची कॅम्पस मुलाखतीत मेसब्रो टेकनॉलॉजिस , सीबीडी बेलापूर नवी मुंबई या कंपनीत निवड

0
उस्मानाबाद :-   तेरणा अभियांत्रिकी महाविद्यालय उस्मानाबाद येथील ट्रैनिंग अँड प्लेसमेंट विभागाच्या वतीने  मेसब्रो टेकनॉलॉजिस , सीबीडी बेलापूर नवी मुंबई  या कंपनीच्या  वतीने   कॅम्पस मुलाखती चे  आयोजन  दि .१०/०२/२०२२  रोजी  करण्यात आले होते कॉम्पुटर सायंन्स अँड इंजिनीरिंग व इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलीकम्युनिकेशन इंजिनीरिंग  या विभागातील ३० पेक्षा जास्त  विद्यार्थ्यांना कौशल्य सिद्ध करण्याची संधी मिळाली त्या मुलाखतीत  तेरणा अभियांत्रिकी महाविद्यालय उस्मानाबाद येथील कॉम्पुटर सायंन्स अँड इंजिनीरिंग व इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलीकम्युनिकेशन इंजिनीरिंग  विभातील तृप्ती कोंढारे ,स्वप्नाली कानडे ,रोहित घुले , ऋतुजा देशमुख ,आकांशा ताकभाते अशा एकूण ५ विध्यार्थाची निवड केली.

  मेसब्रो टेकनॉलॉजिस , सीबीडी बेलापूर , नवी मुंबई हि कंपनी आयटी क्षेत्रात भारत आत्मनिर्भर होण्यासाठी आयटी अँप्लिकेशनची इकोसिस्टिम बनविण्याचे काम करते .    मेसब्रो टेकनॉलॉजिस , सीबीडी बेलापूरनवी मुंबई   या कंपनीच्या  वतीने  श्री प्रसाद कुल्लेकर ,सिनिअर ऑपेरेशनल मॅनेजर , श्री भारत विशे  प्रोजेक्ट कोऑर्डिनेटर , श्री हितेश हुमाने ,हेड ऑफ डेव्हलोपमेंट   व श्री श्रीकांत बांगर , अँप्लिकेशन हेड  यांनी  मुलाखतीचे काम पहिले . 

मेसब्रो टेकनॉलॉजिस , सीबीडी बेलापूर , नवी मुंबई ह्या  कंपनीनमध्ये  आयटी क्षेत्रात भारत आत्मनिर्भर होण्यासाठी आयटी अँप्लिकेशनची इकोसिस्टिम बनविण्याचे काम करण्याची संधी मिल्यामुळे विध्यार्थामध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे

      विध्यार्थाच्या या यशाबाद्दल  संस्थेचे  अध्यक्ष डॉ पदमसिंह पाटील साहेब ,  मा आमदार राणाजगजितसिंह पाटील साहेब , तेरणा पब्लिक चॅरिटेबल  ट्रस्ट चे  विश्वस्त  श्री बाळासाहेब वाघ , श्री अशोकभाऊ शिंदे , श्री विजेंद्रआण्णा  चव्हाण ,  व्यवस्थापकीय  समनवयक प्रा गणेश भातलवंडे  , महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ विक्रमसिंह माने व सर्व विभाग प्रमुख यांनी अभिनंदन केले.

 Photo :1. Photo :1.  मेसब्रो टेकनॉलॉजीस , नेरुळ नवी मुंबई   या  कंपनीचे अधिकारी,महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ विक्रमसिंह माने ,  ट्रैनिंग अँड प्लेसमेंट ऑफिसर प्रा.  अशोक जगताप , प्रा प्रदीप पवार ,  कंपनीमध्ये मध्ये निवड झालेले विध्यार्थी ,

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा (0)
To Top