google.com, pub-1406548548385211, DIRECT, f08c47fec0942fa0 नगराध्यक्षपदासाठी भाजप-शिवसेनेचे प्रत्येकी एक अर्ज

नगराध्यक्षपदासाठी भाजप-शिवसेनेचे प्रत्येकी एक अर्ज

0


उस्मानाबाद जिल्ह्यातील वाशी नगराध्यक्षपदासाठी भरलेल्या अर्जांपैकी अर्ज माघारी घेण्याच्या दिवशी शिवसेना व भाजपकडून प्रत्येकी प्रत्येकी एक अर्ज राहिल्याने दाेन्ही पक्षात अध्यक्षपदासाठी चूरस वाढणार आहे. दरम्यान निवडीच्या पार्श्वभूमीवर भाजपच्या काही सदस्यांना सहलीवर पाठविण्यात आले आहे.

१७ सदस्यसंख्या असलेल्या वाशी नगरपंचायतीमध्ये भाजपने १० जागा जिंकून स्पष्ट बहुमत प्राप्त केले आहे. तर शिवसेनेला सात जागा मिळाल्या आहेत. नगराध्यक्षपदाच्या सोडतीमध्ये अध्यक्षपद हे मागास प्रवर्ग सर्वसाधारणसाठी राखीव सुटले आहे. त्यामुळे भाजपकडून स्मिता गायकवाड व विजयाबाई गायकवाड तर शिवसेनेकडून शिवहार स्वामी यांनी अर्ज दाखल केले होते.

यामुळे एकहाती बहुमत असलेल्या भाजपकडून नेमक्या कोणत्या गायकवाड यांना संधी मिळणार,याविषयी उत्सुकता होती.अर्ज माघारी घेण्याच्या दिवशी शुक्रवारी स्मिता गायकवाड यांचा अर्ज मागे घेण्यात आल्याने भाजपकडून विजयाबाई गायकवाड यांचे तर शिवसेनेकडून शिवहार स्वामी यांचे अर्ज कायम राहिले आहेत. 
सोमवारी नगराध्यक्षपदाची निवड होणार आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा (0)
To Top