आष्टा कासार येथील विविध पक्षातील ६० कार्यकर्त्यांचा भारतीय जनता पक्षात प्रवेश

0

लोहारा/प्रतिनिधी
भाजपा प्रदेश सरचिटणीस आ.सुजितसिंह ठाकुर व आमदार राणाजगजितसिंह पाटील, भाजपा जिल्हाध्यक्ष नितीन काळे यांच्या मार्गदर्शनाखाली व भाजपा लोहाच्या तालुकाध्यक्ष राजेंद्र पाटील यांच्या नेतृत्वात भाजपचे लोकप्रिय आ.गोपीचंद पडळकर यांच्या प्रमुख उपस्थितीत लोहारा तालुक्यातील आष्टा कासार येथील राष्ट्रवादी ओबीसी जिल्हा उपाध्यक्ष चतुर्भुज कागे, काँग्रेसचे अमर कांबळे, शिवसेनेचे अजय कागे, उमेश कोरे, लिंबाजी वाघमोडे, नितीन घोडके, जिंदावली सोनटक्के, शशिकांत गायकवाड, रोहन कांबळे , दयानंद गायकवाड, मासाजी गायकवाड, सौरभ गायकवाड, अनिकेत माटे, महादेव लोहार, यांच्यासह 60 युवक कार्यकर्त्यांनी भारतीय जनता पक्षात जाहीर प्रवेश केला. यावेळी भाजपा नेते माजी जि.प सदस्य गणेश दादा सोनटक्के, पंचायत समिती सदस्य वामनराव डावरे, तालुका सरचिटणीस शिवशंकर हत्तरगे, युवा मोर्चा जिल्हा चिटणीस बालाजी चव्हाण, यावेळी भाजपचे आष्टा शाखा अध्यक्ष महादेव कोरे, बसवराज कोंडे, अमित पोतदार, राजु गायकवाड, बलसुरे अविनाश, यांच्यासह भाजपाचे कार्यकर्ते उपस्थित होते.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा (0)
To Top