Osmanabad news :-
उस्मानाबाद जिल्ह्यात ३ ठिकाणी रस्ता अपघात , वाशीत मारहाण गुन्हा दाखल
रस्ता अपघात.”
अंबी पोलीस ठाणे : बलरामपुर, राज्य- उत्तरप्रदेश येथील कल्लु सत्तार खान व सद्दाम खुद्दुस तेली हे दोघे दि. 03.03.2022 रोजी 13.00 वा. सु. सोनारी येथील रस्त्याने मोटारसायकलने प्रवास करत होते. यावेळी एका अज्ञात टँकरने कल्लु खान चालवत असलेल्या मोसाला समोरुन धडक दिली. या अपघतात कल्लु खान यांसह पाठीमागे बसलेले सद्दाम हे दोघे गंभीर जखमी होउन मयत झाले. या अपघातानंतर अज्ञात टँकरचा अज्ञात चालक अपघात स्थळावरुन वाहनासह पसार झाला. अशा मजकुराच्या कलामुद्दीन खान, रा. बलामपुर यांच्या प्रथम खबरेवरुन भा.दं.सं. कलम- 279, 304 (अ) सह मो.वा.का. कलम- 184, 134 अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.
उस्मानाबाद (ग्रा.) पोलीस ठाणे : चालक- गुणवंत पंडीतराव चैंडे, रा. रामेगाव, ता. लातुर यांनी दि. 27.02.2022 रोजी 16.30 वा. सु. येडशी घाटातील रस्त्यावर कार क्र. एम.एच. 24 एयु 4672 ही निष्काळजीपने चालवल्याने ऑटो रीक्षा क्र. एम.एच. 13 सीटी 3781 ला समोरुन धडकली. या अपघातात ऑटो रीक्षा मधील बापु माणिकराव येवले यांसह दोन प्रवासी हे गंभीर जखमी झाले. या अपघातानंतर नमूद कारचा चालक अपघात स्थळावरुन कारसह पसार झाला. अशा मजकुराच्या बापु येवले यांनी दि. 03.03.2022 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा.दं.सं. कलम- 279, 337, 338 सह मो.वा.का. कलम- 184, 134 अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.
उस्मानाबाद (श.) पोलीस ठाणे : कारी, ता. उस्मानाबाद येथील तानाजी आबा गुरव, वय 52 वर्षे हे दि. 03.02.2022 रोजी 13.00 वा. सु. खानापुर शिवारातील रस्त्याने मोटारसायकल क्र. एम.एच. 13 सीजी 8407 ही चालवत जात होते. यावेळी अज्ञात चालकाने मोटारसायकल क्र. एम.एच. 05 बीएफ 7255 ही निष्काळजीपने चालवल्याने तानाजी गुरव यांच्या मोसाला पाठीमागूण धडकल्याने ते गंभीर जखमी होउन मयत झाले. या अपघातानंतर नमूद मो.सा. चा अज्ञात चालक अपघात स्थळावरुन वाहनासह पसार झाला. अशा मजकुराच्या मयताचा मुलगा- तुषार तानाजी गुरव यांनी अनैसर्गीक मृत्यु क्र. 17 / 2022 फौ.प्र.सं.कलम- 174 च्या चौकशी दरम्यान दिलेल्या लेखी जबाबावरुन भा.दं.सं. कलम- 279, 338, 304 (अ) सह मो.वा.का. कलम- 184, 134 अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.
“मारहान.”
वाशी पोलीस ठाणे : शेंडी, ता. वाशी येथील हिराबाई पवार, मिराबाई चौगुले, करण पवार, आशाबाई दळवे, संजय चौगुले, प्रदिप दळवे, अविनाश या सर्वांनी दि. 03.03.2022 रोजी 05.30 वा. सु. गावकरी- प्रयागबाई शिंदे यांच्या घरात घुसून कौंटुंबीक वादाच्या कारणावरुन प्रयागबाई यांसह त्यांची मुलगी- सिमा, मुलगा- शत्रुघ्न, पुतन्या- प्रकाश, नातु- ओंकार व अविष्कार यांना शिवीगाळ करुन लाथाबुक्क्यांनी, दगड, काठीने मारहान करुन जखमी केले व ठार मारण्याची धमकी दिली. तसेच 10,000 ₹ व दोन स्मार्टफोन हिसकावून घेउन गेले. अशा मजकुराच्या प्रयागबाई शिंदे यांच्या प्रथम खबरेवरुन भा.दं.सं. कलम- 452, 324, 327, 323, 504, 506, 147, 148, 149 अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.