google.com, pub-1406548548385211, DIRECT, f08c47fec0942fa0 आमदार राणाजगजितसिंह पाटील साहेब यांच्याकडून अवकाळी पाऊस व वादळी वाऱ्यामुळे झालेल्या नुकसानीची पाहणी

आमदार राणाजगजितसिंह पाटील साहेब यांच्याकडून अवकाळी पाऊस व वादळी वाऱ्यामुळे झालेल्या नुकसानीची पाहणी

0


Osmanabad news :- 

आमदार राणाजगजितसिंह पाटील साहेब यांच्याकडून अवकाळी पाऊस व वादळी वाऱ्यामुळे झालेल्या नुकसानीची पाहणी .. 

 

तुळजापूर तालुक्यातील अनेक गावांमध्ये अवकाळी पाऊस आणि वादळी वाऱ्याने पशुधन जीवितहानीसह घरांची पडझड व फळ बागांचे नुकसान झाले आहे. महसूलकृषी व महावितरणच्या अधिकाऱ्यांसह मौजे टेलरनगरदिंडेगावयेवतीदेवसिंगा (तुळ)सलगरा (दि) गंधोराकिलज आदी गावांना भेटी देवून आ. राणाजगजितसिह पाटील साहेब यांनी नुकसानीची पाहणी केली.

 

पाहणी दरम्यान किलज शिवारातील २० ते २५ विद्युत खांब व डीपी कोसळले आहेत. अनेकांच्या घरावरील पत्रे उडाल्याने संसार उघड्यावर पडले आहेत. वीज कोसळल्याने गायीम्हशीशेळ्या दगावल्या आहेत. टेलरनगर येथे मोठे वडाचे झाड पडल्याने घराचे मोठे नुकसान झाले असून झाडाखाली दबून काही शेळ्या दगावल्या आहेत. 

 

नुकसानीचे पंचनामे करण्यासाठी महसूल व कृषी विभागाच्या संबंधित अधिकाऱ्यांना यापूर्वीच सूचना देण्यात आल्या होत्या. त्या अनुषंगाने पंचनामे सुरू असल्याचे भेटीवेळी ग्रामस्थांनी सांगितले व उर्वरित पंचनामे त्वरित पूर्ण करण्याच्या सूचना आ. राणाजगजितसिंह पाटील साहेब यांनी अधिकाऱ्यांना दिल्या आहेत.

 

यावेळी तहसिलदार सौदागर तांदळेगटविकास अधिकारी प्रशांतसिंह मरोडमहावितरणचे कार्यकारी अभियंता गुजरतालुका कृषी अधिकारी जाधववसंतराव वडगावेअरविंद पाटीलविजय शिंगाडेप्रशांत लोमटेप्रवीण पाटीलखंडू शिंदे यांच्यासह प्रमुख पदाधिकारीसंबंधित गावाचे लोकप्रतिनिधीतलाठीग्रामसेवककार्यकर्ते यांच्यासह ग्रामस्थ उपस्थित होते.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा (0)
To Top