google.com, pub-1406548548385211, DIRECT, f08c47fec0942fa0 भाजपा प्रदेश सरचिटणीस अतुलजी वझे यांची संघटणात्मक बैठक संपन्न

भाजपा प्रदेश सरचिटणीस अतुलजी वझे यांची संघटणात्मक बैठक संपन्न

0



भाजपा प्रदेश सरचिटणीस अतुलजी वझे यांची संघटणात्मक बैठक संपन्न

 

भारतीय जनता पक्षाचे प्रदेश सचिटणीस तथा कार्यालयीन महामंत्री अतुलजी वझे हे दोन दिवसीय उस्मानाबाद दौऱ्यावर आले असताभाजपचे आमदार राणाजगजितसिंह पाटील व आ सुजितसिंह ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली अतुलजी वझे यांनी जिल्हयातील सर्व प्रदेश कार्यकारणी सदस्य सर्व तालुकाध्यक्ष व प्रमुख पदाधिकारी यांची अत्यंत महत्वपूर्ण बैठक प्रतिष्ठान भवन भाजपा कार्यालय उस्मानाबाद येथे संपन्न झाली. 

या बैठकीमध्ये मार्गदर्शन करताना श्री अतुलजी वझे यांनी उपस्थित सर्व पदाधिकारी यांना केंद्र सरकार राबवित असलेल्या विवीध जनकल्याणकारी योजना जनते पर्यंत पोहचवाव्या तसेच संघटन वाढीसाठी प्रत्येक पदाधिकारी आणि कार्यकर्त्याने अहोरात्र झटणे गरजेचे आहे. तर आणि तरच भविष्यात सुद्धा भारतीय जनता पार्टीचे सरकार पुनश्च स्थापन करत देशाचे पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी यांचे भारत देश हा जगाचा विश्वगुरू बनवंन्याचे स्वप्न पूर्ण होणार आहे. तसेच भाजपच्या प्रत्येक कार्यकर्त्यांचे स्वप्न फळाला येणार आहे. त्यामुळे सर्वांनी एकजुटीने बुधरचना तसेच पार्टीने दिलेले सर्व संघटनात्मक कार्यक्रम यशस्वीरित्या राबवावे असे निर्देश दिले.

 याप्रसंगी जिल्हाध्यक्ष नितीन काळे यांनीही सर्व पदाधिकारी यांना आगामी जिल्हा परिषद पंचायत समिती तसेच नगरपालीका मध्ये भाजपा हाच जनतेच्या मनातला पक्ष असुन भविष्यात संपूर्ण महाराष्ट्रासह भारत देश मा. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात भाजपमय करण्याचे स्वप्न पूर्ण करायचे आहे. असे नितीन काळे यांनी सांगितले

 

या कार्यक्रमास भाजपाचे सर्व प्रदेश कार्यकारणी सदस्य दत्ताभाऊ कुलकर्णीअँड व्यंकटराव गुंडसंताजी चालुक्यअँड खडेराव चौरे अॅड. अनिल काळेनेताजी पाटीलयांच्यासह जिल्हा सरचिटणीस अॅड नितीन भोसलेप्रदिप शिंदेमाधव पवार भाजयुमो जिल्हाध्यक्ष राजसिंह राजनिबांळकरअभय इंगळे ,जिल्हा उपाध्यक्ष डॉ प्रशांत पवार तसेच मंडलप्रमुख कैलास शिंदेमहादेव वडेकर राजेंद्र पाटीलराहुल काकडेसचिन इंगोलेतालुका सरचिटणीस नामदेव नायकलपांडुरंग पवार यांच्यासह तुळजापुर येथील बैठकीस संतोषदादा बोबडेशिवाजी बोधले ,आनंद कंदलेसचिन रोचकरीसुहास साळुंके नागेश नाईकवैभव हांचाटे ,प्रितम मुंडे हे उपस्थित होते


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा (0)
To Top