इंधन दरवाढ व महागाई बध्दल केंद्र सरकारच्या विरोधात युवासेना लोहारा तालुका यांच्यावतीने शहरातील एल.जी.पेट्रोल पंपावर आंदोलन
लोहारा/प्रतिनिधी
शिवसेना पक्षप्रमुख तथा राज्याचे मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे युवासेना प्रमुख आदित्यजी ठाकरे यांच्या आदेशाने, युवासेनेचे सचिव वरूनजी सरदेसाई, माजी खा.प्रा.रविंद्र गायकवाड, खा.ओमराजे निंबाळकर, आ.ज्ञानराजजी चौगुले साहेब, जिल्हा प्रमुख तथा आ.कैलास पाटिल यांच्या मार्गदर्शनाखाली युवानेते किरण गायकवाड यांच्या नेतृत्वाखाली युवा सेना लोहारा तालुका यांच्या वतीने दि.3 एप्रिल 2022 रोजी लोहारा शहरातील माकणी कॉर्नरवरील एल.जी.पेट्रोल पंपावर पेट्रोल, डिझेल दरवाढ व महागाई बध्दल केंद्र सरकारच्या विरोधात थाळी वाजवून आरती करुन घोषणा बाजी करुन आंदोलन करण्यात आले. यावेळी युवा सेना तालुका प्रमुख अमोल बिराजदार, शहर प्रमुख सलीम शेख, युवा सेना शहर प्रमुख श्रीकांत भरारे, अभिमान खराडे, नगरसेवक अविनाश माळी, अर्थ व बांधकाम समिती सभापती गौस मोमिन, पं.स.माजी सदस्य दिपक रोडगे, रोहयो माजी चेअरमन आयुब अब्दुल शेख, सरपंच परवेज तांबोळी, नगरसेवक अमिन सुंबेकर, ओम कोरे, माजी उपसरपंच अविनाश राठोड, कुलदीप गोरे, नितीन जाधव, प्रेम लांडगे, सोण्या महाबोले, महमहदी हिप्परगे, प्रशात थोरात, शेखर पाटील, सहदेव गोरे, संतोष गोरे, अनिल बनसोडे, भास्कर मोरे, रविंद्र पाटील, सुधाकर माने, यांच्यासह युवासेना पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.