१०३४ किलो ग्रॅम गांजा हा अंमली पदार्थ जप्त
उमरगा पोलीस ठाणे : उमरगा गावाजवळच्या राष्ट्रीय महामार्ग क्र. 65 वरील त्रिकोळी टी जंक्शन येथे काल दिनांक 02 एप्रील रोजी 15.30 वा एक अशोक लेलॅन्ड वाहन क्रमांक टी एस 25 टी 3921 हा चालकाच्या निष्काळजीपणामुळे पलटुन त्यातील भाजीपाला व आयताकृती पुडे रस्त्यावर विखुरले होते. या अपघाता नंतर चालकाने घटनास्थळा वरुन पलायन केले होते. यावर पोलीसांना हि माहिती मिळताच सहा पोलीस निरीक्षक अशोक माळी यांसह पथकाने तेथे जाउन खात्री केली असता गांजा या अंमली वनस्पतीची वाळलेली फुले व पाने असे एकुण 506 आयताकृती पुडयांत एकुण 1,034 किलो ग्रॅम गांजा त्या वाहनाच्या हौदयात ठेउन त्याची अवैध वाहतुक केली जात होती. तसेच तपास यंत्रणांना संशय येउ नये म्हणुन त्या गांजा पुडयांवर भोपळे, वांगे, बीट , कोबी, बटाटे, शेवगा शेंगा, तोंडली असा भाजीपाला ठेवण्यात आलेला होता. यावर पथकाने शासकिय पंच व राजपत्रीत अधिकारी यांच्या समक्ष तो गांजा व वाहन जप्त करुन वाहनाचा चालक-मालक दारावत्तु तिरुपती रा. तेलंगण याच्या विरुध्द एन डी पी एस कायदा कलम 20 व भादसं कलम 279 अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.