Osmanabad news :-
परंड्यात अवैध कत्तल खान्यावर स्थानिक गुन्हे शाखेचे च्या पथकाचा छापा
परंडा पोलीस ठाणे : पंरडा-जामगाव रस्त्यालगतच्या एका अवैध कत्तल खान्यावर दिनांक 02 एप्रील रोजी 22.45 वा स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने छापा टाकला. या वेळी परंडा ग्रामस्थ शोयब रशीद शेख व फाजील सौदागर यांसह अन्य दोन पुरुष त्या ठिकाणी 500 कि.ग्रॅ. गोवंशीय मांस, मांस कापण्याचे सुरे, तीन गाई तसेच मांस वाहतुकीसाठी वापरल्या जाणा-या दोन मिनी ट्रक व दोन महिंद्रा पीकअप वाहने तसेच एक बुलेट मोटार सायकलसह आढळले. पोलीसांची चाहुल लागताच ते दोन पुरुष अंधारात पळुन गेले. तर शोयब रशीद शेख व फाजील सौदागर या दोघांना पोलीसांनी तात्काळ अटक करुन महाराष्ट्र प्राणी संरक्षण कायदा अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.