तामलवाडीत चोरीच्या मालासह दोघे अटकेत

0

Osmanabad news :- 

तुळजापूर :  तालुक्यातील तामलवाडी पोलीस ठाणे हदिदतील शेत शिवारातील विदयुत उपसा पंप चोरीस गेल्या प्रकरणी  तामलवाडी पो.ठा. चे प्रभारी अधिकारी श्री. सचिन पं‍डित, पो.उप.नि. रमेश घुले, पोहेकॉ –गाढवे, पोशि- सुरनार, राठोड, सगर असे आरोपींचा शोध घेत होते. दरम्यान पथकास गोपनीय खबर मिळाली कि, वडगाव (काटी) येथील तरुनांचा या चोरीशी संबंध आहे. यावरुन पथकाने काल दि. 8 एप्रिल रोजी गावातील दोन तरुनांना ताब्यात घेतले असता तामलवाडी पो. ठाणे गुन्हा क्र. 1, 51, 52/2022 या भा.द.सं कलम 379 नुसारच्या गुन्हयांतील चोरीच्या 4 पानबुडी विदयुत पंपासह एक एच.टी.पी पंप व एक फवारणी पंप त्यांच्या ताब्यात  आढळल्याने अटक केली आहे अशी माहिती आज 9 एप्रिल रोजी तामलवाडी पोलिस ठाण्यातून देण्यात आली आहे


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा (0)
To Top