जिल्ह्यातील ग्रामीण भागातील रस्त्यांची दुरुस्तीची विहीत मुदतीत कामे पूर्ण करा दिशा समिती सभेत खा. ओमप्रकाश राजे निंबाळकरांचे अधिका-यांना आदेश
उस्मानाबाद:दि,14(जिमाका):-जिल्
सुरुवातीस नोव्हेंबर 2021 मध्ये घेण्यात आलेल्या आढावा बैठकीत दिलेल्या सूचनांच्या अनुपालनाबाबत बैठक घेण्यात आली. यावेळी आमदार कैलास पाटील, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी राहुल गुप्ता, अप्पर जिल्हाधिकारी रुपाली आवले, निवासी उपजिल्हाधिकारी शिवकुमार स्वामी, तसेच जिल्ह्यातील सर्व विभागातील प्रमुख उपस्थित होते.
यावेळी प्रधानमंत्री ग्राम सडक योजना,मुख्यमंत्री ग्राम सडक योजना,राष्ट्रीय सामाजिक सहाय्य योजना,डिजिटल इंडिया लॅंड रेकॉर्ड, मनरेगा,प्रधानमंत्री उज्जवला योजना,शिधापत्रिका नोंदणी,प्रधानमंत्री आवास योजना(शहरी),घरकुल योजना,स्वच्छ भारत मिशन,राष्ट्रीय पेयजल कार्यक्रम,जल जीवन मिशन,प्रधानमंत्री कृषी सिंचन योजना,प्रधानमंत्री फसल बीमा योजना,समग्र शिक्षण अभियान,राष्ट्रीय आरोग्य मिशन,महिला व बालकल्याण विभाग,दीनदयाल उपाध्याय ग्राम ज्योती योजना,दूरसंचार, रेल्वे,हायवे अथॉरिटी दीनदयाल उपाध्याय ग्रामीण कौशल्य विकास योजना आणि खरिप पीक हंगाम या सर्व योजनांबाबत दिलेल्या सूचनांवर केलेल्या अनुपालनाविषयी सभेत सविस्तर आढावा घेण्यात आला.
राष्ट्रीय सामाजिक सहाय्य योजनेची प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी सर्व तलाठ्यांनी आपआपल्या गावात याबाबत महिती द्यावी.डिजिटल इंडिया लॅड रेकॉर्ड विभागाने शेतरस्त्यांची कामे लवकर पूर्ण करावी.प्रधान मंत्री आवास योजना (शहरी) अंतर्गत गरजू आणि होतकरू लाभार्थ्यांचे शोध लावून त्यांना या योजनेचा लाभ देण्यासाठी प्रयत्न करावेत. यासाठी बैठकींचे आयोजन करावेत. जिल्ह्यातील अनेक ठिकाणी महिलांना स्वच्छता गृह नसल्याने त्यांना त्रास सहन करावा लागत आहे.उस्मानाबाद शहरातही महिलांना स्वच्छता गृह नाहीत.त्यामुळे महिलांसाठी सव्च्छता गृहे बांधावे आणि ग्रीन टॉयलेट मोक्याच्या तसेच गर्दीच्या ठिकाणी लावण्याची कार्यवाही स्वच्छ भारत मिशन अंतर्गत करावी असेही यावेळी श्री. निंबाळकर आणि श्री पाटील यांनी सूचना केली.
राष्ट्रीय पेयजल योजनेंतर्गत प्रत्येक गावात पिण्याचे स्वच्छ पाणी देण्यासाठी कामे सुरू आहेत.तथापि, काही ठिकाणी कामे प्रलंबित आहेत. वेळेवर काम पूर्ण न करणा-या गुत्तेदारास काळ्या यादीत टाकण्याची गरज आहे. अशा गुत्तेदारांची यादी दिशा समितीकडे पाठवण्याच्या सूचनाही यावेळी करण्यात आली . जीर्ण झालेल्या आणि नादुरुस्त असलेल्या वर्ग खोल्या दुरुस्त करण्यासाठी समग्र शिक्षण अभियानांतर्गत मुख्याध्यापकांनी निधीची मागणी करावी. नवीन वर्ग खोल्या बांधण्यासाठी तसेच शाळेला सुरक्षा भिंत बांधण्यासाठीही प्रस्ताव पाठवावेत. लोकसंख्येच्या तुलनेत जिल्हा स्त्री रुग्णालय फक्त 60 खाटांचा आहे. महिलांसाठी मोठा रुग्णालय बांधण्यासाठी प्रस्ताव पाठवावा. रुग्णवाहिकांसाठी वाहन चालकांची व्यवस्था करावी.कोरोना पूर्णपणे हद्दपार झाला नसून लसीकरण शंभर टक्के करण्यावर लक्ष्य केंद्रित करावेत. ज्या नागरिकांनी दुसरा डोस घेतलेला नाही त्यांना दुसरा डोस द्यावा अशा सूचनाही यावेळी देण्यात आल्या.
उस्मानाबाद रेल्वे स्टेशनची अवस्था दयनीय झाली आहे.याठीकाणी प्रचंड अस्वच्छता आहे. तसेच कोच इंडिकेटर नसल्याने प्रवाशांची गैरसोय होत आहे. रेल्वे विभागाने याकडे लक्ष द्यावे. रेल्वेने बांधलेल्या रस्त्यांची अवस्था अत्यंत गौण आणि दुय्यम दर्जाची आहे.गेल्या तीन वर्षात केलेल्या रस्ते,नाल्या आणि पुलांच्या कामाची माहिती रेल्वेने दिशा समितीस तात्काळ उपलब्ध करून द्यावी अशा सूचनाही यावेळी देण्यात आले.
यावेळी खा. निंबाळकर आणि आ. पाटील यांनी सर्व विभाग प्रमुखांना दिलेल्या सूचनांचे अनुपालन करण्याचे तसेच प्रलंबित कामे वेळेत पूर्ण करण्याचे आवाहन केले.