उप मुख्यमंत्री मा.ना.देवेंद्रजी फडणवीस साहेब यांच्या वाढदिवसानिमीत्त उपक्रम - ३००० रोजगार निर्मितीचे प्रकल्प
राज्याचे उप मुख्यमंत्री मा.ना.देवेंद्रजी फडणवीस साहेब यांच्या वाढदिवसा निमीत्त देशाचे पंतप्रधान ना.नरेंद्रजी मोदी यांची आत्मनिर्भर भारत ही संकल्पना प्रभावीपणे राबविण्यासाठी आ.राणाजगजितसिंह पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली ‘आत्मनिर्भर भारत; आत्मनिर्भर उस्मानाबाद’ अभियानांतर्गत प्रधानमंत्री रोजगार निर्मीती कार्यक्रम (PMEGP) व मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रम (CMEGP) या योजनांचा लाभ घेण्यासाठी प्रस्ताव नोंदणी शिबीराचा शुभारंभ भाजपा जिल्हाध्यक्ष नितीन काळे यांच्या प्रमुख उपस्थितीत भाजपा कार्यालय, उस्मानाबाद येथे करण्यात आला.
जिल्हयातील युवकांना नवीन उद्योग उभारण्यासाठी अथवा चालु व्यवसाय वृध्दींगत करण्यासाठी या योजनांच्या माध्यमातुन अनुदानासह कर्ज स्वरुपात भांडवल उपलब्ध करुन दिले जाते. बुथ तेथे उद्योजक या संकल्पनेतुन जिल्हयात अनेक मार्गदर्शन शिबीरे आयोजीत करुन या योजनांचा लाभ घेण्याबाबत मार्गदर्शन करण्यात आलेले आहे, किंबहुना अनेकांना कर्ज मंजुर करण्यासाठी मदत करण्यात आलेली आहे. या योजनेतंर्गत कर्ज धारकांना २५% ते ३५% अनुदान देण्यात येते.
ना.देवेंद्रजी यांनी मुख्यमंत्री असतांना कौडगाव औद्योगीक वसाहतीमध्ये १० हजार युवकांना रोजगाराच्या संधी उपलब्ध करुन देणारा टेक्नीकल टेक्सटाईल पार्क मंजुर केला होता. सौर उर्जा प्रकल्प, मराठवाडा वॉटर ग्रीड, शासकीय वैद्यकीय महाविद्यालय या जिल्हयासाठी अत्यंत महत्वपुर्ण असलेल्या प्रकल्पांसाठी त्यांचे मोठे सहकार्य व मार्गदर्शन लाभले आहे.
प्रधानमंत्री रोजगार निर्मिती व मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रम या योजनांचा जिल्हयातील जास्तीत जास्त युवक युवतींनी लाभ घ्यावा या अनुषंगाने त्यांच्या वाढदिवसानिमीत्त प्रस्ताव नोंदणी शिबीराचा शुभारंभ करण्यात आला असुन दि.२५ जुलै २०२२ ते २९ जुलै २०२२ दरम्यान जिल्हयातील प्रत्येक तहसील कार्यालयामध्ये शिबीराचे आयोजन करण्यात आले आहे. प्रस्ताव नोंदणी केलेल्यांना प्रकल्प अहवाल तयार करण्यापासुन कर्ज मंजुरी पर्यंत आवश्यक ते सर्व सहकार्य करण्यात येणार आहे. सदर योजनेच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी केंद्रीय अर्थ राज्यमंत्री ना.डॉ.भागवत कराड साहेब यांच्यासह सुक्ष्म,लघु व मध्यम उद्योगमंत्री ना.नारायण राणे यांचे देखील सहकार्य लाभत आहे.
या आर्थिक वर्षात या योजनांतर्गत ३००० प्रकल्पांना मंजुरीचे उद्दिष्ट ठरविले असुन आता पर्यंत ८५० प्रकल्पांना जिल्हा उद्योग केंद्राची मान्यता मिळाली आहे. जिल्हयातील जास्तीत जास्त युवक युवतींनी याचा लाभ घ्यावा असे आवाहन आ.राणाजगजितसिंह पाटील यांनी केले आहे.
यावेळी माजी जि.प.अध्यक्ष नेताजी पाटील, युवा मोर्चाचे जिल्हाध्यक्ष राजसिंह राजेनिंबाळकर, माजी उप नगराध्यक्ष अभय इंगळे, प्रविण पाठक, भाजपा शहराध्यक्ष राहुल काकडे, विद्या माने, सागर दंडनाईक, अक्षय भालेराव यांच्यासह पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.