तुळजापूर येथे ना पिकास कंटाळून शेतकऱ्याची गळफास
तुळजापूर प्रतिनिधी :पंधरा दिवसापासून सातत्य पाऊस असल्याने व शेतीमध्ये पेरलेले सोयाबीन उगवले नसल्याने नापिकास कंटाळून 52 वर्षीय व्यक्तीने लिंबाच्या झाडाला गळफास घेऊन आपली जीवन यात्रा संपवली असल्याची धक्कादायक घटना तुळजापूर तालुक्यामध्ये घडली आहे .
याबाबत प्राप्त झालेल्या माहितीनुसार तुळजापूर तालुक्यातील बिजनवाडी येथील लक्ष्मण भगवान निकम वय वर्ष 52 हे पंधरा दिवसापासून सतत पाऊस असल्याने व शेतीमध्ये पेरलेले सोयाबीन उगवले नसल्याने नापिकास कंटाळून दिनांक 19 जुलै रोजी सहा वाजण्याच्या सुमारास राहते घरासमोरील लिंबाच्या झाडाला दोरीने गळफास घेतला आहे
अशा प्रकारची खबर बब्रुवान भगवान निकम वय 52 वर्ष राहणार बिजनवाडी तालुका तुळजापूर यांनी दिलेल्या खबरे वरून तुळजापूर पोलीस स्टेशन येथे दिनांक 19रोजी आकस्मित मृत्यूची नोंद करून पुढील तपास कामी हेड कॉन्स्टेबल अतुल यादव यांच्याकडे देण्यात आली आहे .