पवनचक्कीच्या चोरीच्या केबलसह 3 आरोपी अटक.
स्थानिक गुन्हे शाखा : लोहारा तालुक्यातील हिप्परगा (रवा) व नागराळ शिवारातील चार पवनचक्क्यांचे, उंडरगाव शिवारातील 3 पवनचक्क्यांचे, उस्मानाबाद तालुक्यातील ताकविकी शिवारातील दोन पवनचक्क्यांचे आणि तुळजापूर तालुक्यातील कार्ला शिवारातील 4 पवनचक्क्यांचे केबल अज्ञात व्यक्तीने चोरुन नेल्यावरुन लोहारा पो.ठा. येथे गुन्हा क्र. 175 व 186 /2022, बेंबळी पो.ठा. येथे 157/2022 व नळदुर्ग पो.ठा. येथे गुन्हा क्र. 223/2022 हे भा.दं.सं. कलम- 379 अंतर्गत अनुक्रमे 4 जुलै, 18 जुलै व 19 जुलै या तारखेला गुन्हे दाखल आहेत.
तपासादरम्यान मा. पोलीस अधीक्षक श्री. अतुल कुमार यांच्या सुचनेप्रमाणे स्थानिक गुन्हे शाखेचे पथक उस्मानाबाद तालुक्यात काल दि. 19 जुलै रोजी गस्तीस असताना पथकास गोपनीय माहिती मिळाली की, उस्मानाबाद शहरातील पापनासनगर ग्रामस्थ- अल्लाउद्दीन गोसखॉ पठाण, साठेनगर ग्रामस्थ- सोमनाथ रामा काळे व जुना बस डेपो ग्रामस्थ- सुलतान बाबासाहेब मुलानी या तीघांनी नमूद चोऱ्या केल्या आहेत. यावर पथकाने लागलीच त्या तीघांना ताब्यात घेउन त्यांच्या ताब्यातून चोरीतील नमूद केबल पैकी अंदाजे 68,480 ₹ किंमतीचे 85.600 कि.ग्रॅ. वजनाचे केबल जप्त करुन त्या तीघांना चोरीच्या मालासह लोहारा पो.ठा. च्या ताब्यात दिले असून पुढील तपास लोहारा पोलीस करत आहेत.
सदरची कामगीरी मा. पोलीस अधीक्षक श्री. अतुल कुलकर्णी व मा. अपर पोलीस अधीक्षक श्री. नवनीत काँवत यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक श्री. रामेश्वर खनाळ यांच्या सुचनांप्रमाणे स्थागुशा चे सपोनि- श्री. मनोज निलंगेकर, पोहेकॉ- जावेद काझी, प्रकाश औताडे, धनंजय कवडे, मस्के, पोना- शौकत पठाण, शैला टेळे, पोकॉ- बलदेव ठाकुर, साईनाथ आशमोड यांच्या पथकाने केली आहे.