ओबीसी समाजाचे आरक्षण अबाधीत - भाजपा ओबीसी मोर्चाच्या वतीने उस्मानाबाद येथे जल्लोष

0


ओबीसी समाजाचे आरक्षण अबाधीत - भाजपा ओबीसी मोर्चाच्या वतीने उस्मानाबाद येथे जल्लोष

ओबीसी समाजाच्या लढ्याचा विजय - जिल्हाध्यक्ष विजय शिंगाडे

शिंदे-फडणवीस सरकारचे मानले आभार

बांठीया आयोगाच्या शिफारसी मान्य करुन ओबीसी समाजाचे राजकीय आरक्षण पूर्ववत ठेवण्यात यावे असा निकाल मा.सर्वोच्च न्यायालयाने दिला आहे. मा.न्यायालयाच्या या निकालाचे आज (दि.20) उस्मानाबाद जिल्हा भारतीय जनता पार्टी ओबीसी मोर्चाच्या वतीने फटाक्यांची जोरदार आतषबाजी करीत गुलाल उधळून, मिठाई वाटून स्वागत करण्यात आले. शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे हा आनंदोत्सव साजरा करण्यात आला.

यावेळी बोलताना भाजपा ओबीसी मोर्चाचे जिल्हाध्यक्ष विजय शिंगाडे म्हणाले की,हे आरक्षण आमदार राणाजगजितसिंह पाटील व सुजितसिंह ठाकूर यांच्या नेतृत्वाखाली केलेल्या आंदोलनाचे यश असून  बांठीया आयोगाने सादर केलेला इम्पिरिकल डेटा मा.सर्वोच्च न्यायालयाने मान्य करुन ओबीसींचे राजकीय आरक्षण ठेवण्याचा निर्णय दिला आहे. गेल्या अडीच वर्षापासून भाजपा ओबीसी मोर्चाने केलेल्या पाठपुरावा आणि लढ्याला आलेले हे मोठे यश आहे. ओबीसी आरक्षणासाठी राज्याचे मुख्यमंत्री मा.एकनाथजी शिंदे व उपमुख्यमंत्री मा.देवेंद्रजी फडणवीस यांनी न्यायालयात सरकारची बाजू भक्कमपणे मांडल्याबद्दल दोघांचेही ओबीसी मोर्चाच्या वतीने आभार श्री.शिंगाडे यांनी व्यक्त केले. 

यावेळी ज्येष्ठ नेते प्रदेश कार्यकारिणी सदस्य अ‍ॅड.खंडेराव चौरे, भाजपा ओबीसी मोर्चा प्रदेश सचिव पिराजी मंजुळे, शहराध्यक्ष राहुल काकडे, पांडुरंग लाटे, मा.नगरसेवक युवराज नळे,दाजी अप्पा पवार, लक्ष्मण माने, इंद्रजित देवकते, वैभव हंचाटे, सतीश कदम, दुर्गाप्पा पवार,ओबीसी मोर्चा शहराध्यक्ष ज्ञानेश्वर सुळ,सुनील पंगुडवाले यांच्यासह भाजपा, ओबीसी मोर्चाचे पदाधिकारी, कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा (0)
To Top