भारत सरकार शिष्यवृत्तीसाठी अर्ज केलेल्या अनुसूचित जातीच्या विद्यार्थ्यांनी आधारशी संलग्निकृत मोबाईल क्रमांक महाविद्यालयास देण्याचे आवाहन
उस्मानाबाद,दि.20(जिमाका):- सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागांतर्गत देण्यात येणा-या भारत सरकार शिष्यवृत्ती या योजनेअंतर्गत शैक्षणिक वर्ष 2021-22 करिता अनुसूचित जाती प्रवर्गातील विद्यार्थ्यांनी त्यांच्याकडील आधारशी सलग्नीत मोबाईल क्रमांक महाविद्यालयास द्यावेत ,असे आवाहन समाज कल्याणचे सहायक आयुक्त बाबासाहेब अरवत यांनी केले आहे . राज्य शासनाच्या http://mahadbtmahait.gov.in या संकेत स्थळावर ज्या विद्यर्थ्यांना भारत सरकार शिष्यवृत्तीसाठी महाडीबीटी प्रणाली वरून ऑनलाईन अर्ज नोंदणीकृत केले आहेत. या अर्जांची पडताळणी आणि तपासणी करून महाविद्यालयांनी प्रस्तुत कार्यालयास सादर केलेल्या अर्जाची छानणी करून पात्र अर्जांची शिष्यवृत्ती मंजूर केली आहे.
त्याचप्रमाणे, 2021-22 या शैक्षणिक वर्षापासून या योजनेअंतर्गत केंद्र शासनाचा हिस्सा (60 टक्के) निधी हा थेट केंद्र शासनाकडून विद्यार्थ्यांच्या आधार संलग्निकृत बँक खात्यामध्ये वितरीत करण्यात येत आहे. त्या अनुरोधाने महाडीबीटी पोर्टल वरून पात्र विद्यार्थ्यांच्या अर्जातील माहिती थेट केंद्र शासनाच्या NSP पोर्टल यांच्याकडे सादर करण्यात येत आहे.
मात्र, यामध्ये अद्यापही काही विद्यार्थ्यांचे आधार संलग्निकृत मोबाईल क्रमांक चुकीचे असल्याचे निदर्शनास आले आहे. अशा विद्यार्थ्यांची शिष्यवृत्ती NSP द्वारे अदा होत नाहीत. त्यामुळे जिल्हयातील शिष्यवृत्तीधारक अनु.जातीच्या ज्या विद्यार्थ्यांनी आपल्या आधार क्रमांकाला मोबाईल क्रमांक संलग्न केलेला नाही अशा विद्यार्थ्यांनी तात्काळ आपला मोबाईल क्रमांक आधार संलग्निकृत करूनआधार संलग्निकृत मोबाईल क्रमांक आपल्या महाविद्यालयास देण्यात यावा. अन्यथाआपली 2021-22 ची भारत सरकार शिष्यवृत्ती आपल्या खात्यामध्ये जमा होणार नाही याची नोंद घेण्यात यावी.
तसेच सर्व महाविद्यालयांनी अशा विद्यार्थ्यांची त्रुटी पूर्तता करण्याकरिता विद्यार्थ्यांचे आधार संलग्निकृत मोबाईल क्रमांक प्राप्त करून घेऊन आपल्या महाविद्यायास देण्यात आलेल्या Excel Sheet मध्ये तात्काळ अद्ययावत करून दि. 21 जुलै 2022 पर्यंत या कार्यालयाकडे सादर करण्यात यावे, असेही आवाहन श्री . अरवत यांनी केले आहे.