इंग्रजी माध्यामांच्या नामांकित निवासी शाळांमध्ये धनगर समाजाच्या विद्यर्थ्यांना संधी
उस्मानाबाद,दि.20(जिमाका):- धनगर समाजातील विद्यार्थ्यांना शहरातील इंग्रजी माध्यामांच्या नामांकित निवासी शाळांमध्ये शिक्षण देण्याची योजना सुरू करण्यात आली आहे. या योजनेमध्ये जिल्हयातील उस्मानाबाद येथील सहयाद्री इंटरनॅशनल स्कूल आणि उमरगा येथील डॉ. के.डी.शेंडगे इंग्लिश स्कूल या दोन शाळेंची निवड झालेली आहे. या शाळेमध्ये या योजनेतील प्रवेशित विद्यार्थ्यांना शासन निर्णयानुसार देण्यात आलेल्या सोई-सुविधा मोफत उपलब्ध आहेत. शाळेत या योजनेअंतर्गत पहिली ते पाचवी या वर्गातील प्रवेशासाठी दि.28 जुलै 2022 पर्यंत अर्ज करणे आवश्यक आहे. प्रवेश घेण्याकरिता सहाय्यक आयुक्त समाज कल्याण कार्यालयाकडे लेखी स्वरूपात अर्ज करण्यात यावेत.
विद्यार्थ्यांने विहित नमुन्यातील अर्ज (या कार्यालयाकडे उपलब्ध आहे ), जातीचा दाखला, जन्माचा दाखला, पालकाचे उत्पन्न (1 लाखाच्या आत असावे ) इत्यादी कागदपत्रे जोडून अर्ज या कार्यालयाकडे विहीत मुदतीमध्ये सादर करावा.
या योजनेकरिता धनगर समाजातील जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी याचा लाभ घ्यावा, असे आवाहन समाज कल्याणचे सहाय्यक आयुक्त बाबासाहेब अरवत यांनी केले आहे.