कृषी पायाभुत सुविधा निधी योजनेंतर्गत 26 जुलैला जिल्हास्तरीय कृतीसंगम कार्यशाळेचे आयोजन
उस्मानाबाद,दि.20(जिमाका) कृषी पायाभुत सुविधा निधी ( AIF ) योजना प्रभावीपणे राबविण्यासाठी योजनेशी संबंधित जिल्ह्यातील सर्व वित्तीय आणि सहभागी, भागिदारी संस्था, विविध शासकीय विभाग, महामंडळे यांच्यात समन्वय आणि विविध योजना, प्रकल्प यांच्यात अभिसरणासाठी जिल्हाधिकारी कौस्तुभ दिवेगावकर यांच्या अध्यक्षतेखाली 26 जुलै 2022 रोजी सकाळी 11 : 00 वाजता मध्यवर्ती शासकीय इमारतीतील जिल्हा नियोजन समिती सभागृहात जिल्हास्तरीय कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले आहे.
महाराष्ट्राचे कृषी आयुक्त यांच्या सूचनेनुसार ही जिल्हास्तरीय कृतिसंगम कार्यशाळा होणार आहे . यात जिल्ह्यातील सर्व वित्तीय आणि सहभागी, भागिदारी संस्था, विविध शासकीय विभाग, महामंडळे यांची उपस्थिती असणार आहे . या कार्यशाळेत जिल्ह्यातील सर्व वित्तीय व सहभागी, भागिदारी संस्था, विविध शासकीय विभाग, महामंडळे यांचा सक्रीय सहभाग आवश्यक आहे. या कार्यशाळेत जिल्ह्यातील प्रगतीशील शेतकरी , शेतकरी गट , शेतकरी उत्पादक कंपनी यांचे प्रतिनिधी उपस्थित राहण आहेत . या कार्यशाळेत कृषी पायाभुत सुविधा निधी ( AIF ), नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्प – पोक्रा, बाळासाहेब ठाकरे कृषी व्यवसाय आणि ग्रामीण परिवर्तन - ( स्मार्ट ) प्रकल्प, PMFME - प्रधानमंत्री सुक्ष्म प्रकिया उद्योग योजना, मुख्यमंत्री अन्न प्रक्रिया योजना, राष्ट्रीय कृषी विकास योजना, पशुसंवर्धन, मत्स्यव्यवसाय विभाग यांच्याकडील योजना, एमएसआरएलएम - MSRLM, महिला आर्थिक विकास महामंडळ यांच्याकडील योजना, 10 हजार शेतकरी उत्पादक कंपनी, मॅग्नेट प्रकल्प या योजनांची माहिती देण्यात येणार आहे , असे आत्माचे प्रकल्प संचालकानी कळविले आहे.