रात्रगस्तीदरम्यान पोलीसांना दोन पुरुष संशयीतरित्या आढळले
उमरगा पोलीस ठाणे : उमरगा पोलीस ठाण्याचे पथक दि. 22 जुलै रोजी 02.00 वा. सु. हद्दीतील कदेर फाटा येथे रात्रगस्तीस असताना तेथे दोन पुरुष अंधाराचा दबा धरुन बसलेले पथकास आढळले. पथकाने त्या दोघांची विचारपुस केली असता त्यांनी आपली नावे- आण्णाराव गंगाराम चव्हाण व राजेश पोमा पवार, दोघे रा. अंबरनगर तांडा, मुरुम, ता. उमरगा असे सांगीतले. अशा अवेळी तेथे उपस्थित असण्याबाबत विचारणा केली असता ते पथकास समाधानकारक उत्तरे देत नसल्याने पथकाने त्या दोघांची अंगझडती घेतली असता त्यांच्या ताब्यात एक कुऱ्हाड व एक मारतुल मिळुन आला. ते दोघे माला विषयीचे गुन्हे करण्याच्या उद्देशाने तेथे दबा धरुन बसले असल्याचा पथकाचा संशय बळावल्याने त्या दोघांना ताब्यात घेउन त्यांच्याविरुध्द उमरगा पो.ठा. येथे महाराष्ट्र पोलीस कायदा कलम- 122 सह भा.दं.सं. कलम- 34 अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.