उमरगा, लोहारा तालुक्यातील अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या गावातील पिकांच्या नुकसानीचे पंचनामे करून शेतकऱ्यांना मदत जाहीर करावी --आ.ज्ञानराज चौगुले

0
उमरगा, लोहारा तालुक्यातील अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या गावातील पिकांच्या नुकसानीचे पंचनामे करून शेतकऱ्यांना मदत जाहीर करावी --आ.ज्ञानराज चौगुले


लोहारा/प्रतिनिधी
उमरगा, लोहारा तालुक्यातील अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या गावातील पिकांच्या नुकसानीचे पंचनामे करून शेतकऱ्यांना मदत जाहीर करावी, अशा मागणीचे निवेदन आ.ज्ञानराज चौगुले यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना दिले आहे. 


या निवेदनात म्हटले आहे की, उमरगा, लोहारा तालुक्यात मागील काही दिवसात झालेला सर्वदुर पाऊस कांही मंडळात झालेल्या अतिवृष्टीमुळे सोयाबीन,उडिद, मुग, तूर, आदि,खरीप पिकांचे अतोनात नुकसान झालेले आहे. तसेच काही ठिकाणी नदिकाठच्या गावांतील शेतकऱ्यांचा जमिनी वाहून गेल्या आहेत. 

माझ्या मतदार संघातील शेतकऱ्यांना मागील 2 वर्षांपासून सततच्या अतिवृष्टीमुळे मोठ्या प्रमाणात आर्थिक नुकसानीस सामोरे जावे लागत आहे. विशेषताः 2020 सालच्या नुकसानीपोटी मिळणारी पिक विम्याची रक्कमही अद्याप शेतकऱ्यांना मिळालेली नाही. तसेच कांही भागातील सोयाबीन पिकेही गोगलगायीच्या प्रादुर्भावामुळे मोठ्या प्रमाणात नुकसान झालेले आहे.

 यामुळे शेतकरी आधीच आर्थिक संकटात असताना यंदाचे नुकसान त्यांना पेलणारे नाही. करीता नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना शासनाकडून भरघोस मदत जाहीर करावी. उमरगा, लोहारा तालुक्यात पाऊस अतिवृष्टी व गोगलगायीच्या प्रादुर्भावामुळे नुकसान झालेल्या पिकांचे व पावसात वाहून गेलेल्या पंचनामे करणेबाबत संबंधित विभागास आदेशित करुन शेतकऱ्यांना शासनाकडून जास्तीत जास्त मदत जाहीर करावी, अशी मागणी केली आहे. यावेळी तात्काळ मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी याबाबत जिल्हाधिकारी यांना आदेशित केले आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा (0)
To Top