पिकांचे प्रशासनाकडून पंचनामे करण्यास तुळजापूर तालुक्यात सुरुवात

0
तुळजापूर तालुक्यातील येवती व परिसरात पावसाने शेती पिकाचे झाले नुकसान शेतकऱ्यांवर ओढावले पुन्हा आर्थिक संकट आले आहे प्रशासनाकडून पंचनामे करण्यास सुरुवात झाली आहे.

येवती येथे व परिसरात सतत पडणार्या पावसामुळे शेती पिके पुर्ण पाण्याखाली गेल्या मुळे पिके पिवळी पडली आहेत, गोगलगायीचा पैशाचा प्रभाव त्यामुळे शेतकरी पुन्हा संकटात आला आहे. शेतकऱ्यांनी व विविध संघटनांनी केलेल्या मागणीनुसार प्रशासनाच्या वतीने पंचनामे करण्यास सुरुवात केली आहे. 

 गेल्या दोन वर्षांपासून नुकसान भरपाई मिळत नसून फक्त पंचनामे नकोत मदत ही द्या अशी मागणी शेतकर्यांनी प्रशासनाकडे  केली आहे.

 यावेळी येवती तलाठी सज्जा चे तलाठी ए. बी. काळे सर, राष्ट्रवादी तालुका युवक उपाध्यक्ष समाधान ढोले,महेबुब शेख, नितीन तांबे व समस्थ गावकरी उपस्थित होते.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा (0)
To Top