अवैध गुटखा बाळगणाऱ्यावर गुन्हा दाखल.
उस्मानाबाद (ग्रा.) पोलीस ठाणे : उस्मानाबाद (ग्रा.) पोलीसांचे पथक दि. 05 ऑगस्ट रोजी 09.00 वा. सु. कौडगाव येथील महामार्गावर गस्त करत होते. यावेळी गावातील एका किराणा दुकानासमोर उभ्या असलेल्या मोटारसायकल स्वारास पोलीसांनी संशयावरुन हटकले.
यावेळी त्या मोटारसायकलवरील पोत्यात अंदाजे 14,820 ₹ किंमतीचे महाराष्ट्र शासन प्रतिबंधीत अन्न पदार्थ सुगंधी गुटख्याचे 116 पुडके आढळले. यावरुन पोलीसांनी त्या मोटारसायकल स्वार- बाळासाहेब जाधव, रा. घाटंग्री, ता. उस्मानाबाद यास अटक करुन त्याच्याविरुध्द उस्मानाबाद (ग्रा.) पो.ठा. येथे गुन्हा क्र. 158/2022 हा भा.दं.सं. कलम- 328, 188, 272, 273 अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.