उस्मानाबाद जिल्ह्यात तीन ठिकाणी निष्काळजीपनाचे कृत्य करणाऱ्यांवर गुन्हे दाखल.
उस्मानाबाद जिल्हा : सार्वजनिक रस्त्यावर रहदारीस धोकादायकरित्या वाहन उभे करणे व मद्यधुंत अवस्थेत वाहन चालवने अशा प्रकरणी उस्मानाबाद पोलीसांनी काल दि. 27 ऑगस्ट रोजी तीन कारवाया केल्या. यात पेठसांगवी ग्रामस्थ- शिवाजी कांबळे व गुंजोटी ग्रामस्थ- दिगंबर दुधभाते या दोघांनी 17.30 वा. सु. उमरगा शहरातील राष्ट्रीय महामार्गावर आपापले ऑटोरिक्षा रहदारीस धोकादायकरित्या उभा करुन भा.दं.सं. कलम- 283 चे उल्लंघन केले. तर बीड ग्रामस्थ- हनुमंत पुरी यांनी 19.13 वा. सु. कळंब शहरातील सार्वजनिक रस्त्यावर मोटारसायकल क्र. एम.एच. 09 बीक्यु 4306 ही मद्यधुंद अवस्थेत चालवून भा.दं.सं. कलम- 185 चे उल्लंघन केले.
यावरुन पोलीसांनी सरकारतर्फे दिलेल्या प्रथम खबरेवरुन नमूद व्यक्तींविरुध्द उमरगा पो.ठा. येथे 2 तर कळंब पो.ठा. येथे 1 गुन्हा नोंदवला आहे.