गणेशोत्सव पार्श्वभुमीवर पोलीस-जनता सुसंवादाच्या मॅराथॉन बैठकांचे आयोजन.”
Tuljapur :-
आगामी काळात साजरा होणाऱ्या गणेशोत्सवाच्या पार्श्वभुमीवर तुळजापूर येथील पोलीस संकुलात तुळजापूर पोलीसांनी आज दि. 28 ऑगस्ट रोजी जनसंवादाचे आयोजन केले होते. याप्रसंगी पंचायत समिती, महसुल विभाग, नगरपरिषद, महावितरणाच्या प्रतिनिधींसह शहरातील अनेक मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते. जिल्ह्यात हजारोंच्या संखेने सार्वजनिक गणेश मंडळे मुर्ती स्थापना करुन सार्वजनिक कार्यक्रमांचे आयोजन करत असतात. परंतु काही प्रसंगी अति उत्सहाच्या भरात काही समाज विघातक आक्षेपार्ह देखावे उभारत असल्याने त्यातून सामाजिक ऐक्य व शांतता यास बाधा होण्याची शक्यता असते. तरी सर्व सार्वजनिक मंडळांनी आक्षेपार्ह देखावे न उभारता समाज सुधारणेचे व प्रबोधनाचे देखावे उभारावेत. सार्वजनिक मंडळांनी पोलीस ठाण्यात नोंदणी करुन आवश्यकता असल्यास ध्वनीक्षेपक परवाने मोफत प्राप्त करुन घ्यावेत. मंडप उभारताना व मिरवणुक प्रसंगी वाहतुक नियमांचे पालन, ध्वनी प्रदुषण, पाणी प्रदुषण यांना आळा घालुन पर्यावरण पुरक गणेशोत्सव या संकल्पनेसह ‘एक गाव एक गणपती’ / ‘एक गल्ली एक गणपती’ इत्यादी संकल्पना राबवाव्यात. असे आवाहन तुळजापूर पोलीसांनी जनतेस केले आहे